Kolhapur Politic's : शिवाजी पाटलांची आता मुख्यमंत्र्यांकडे मुश्रीफांच्या राजीनाम्याची मागणी : ‘गोकुळ’वरून जिल्हा बँकेतील कर्जाचा विषय काढला बाहेर

Shivaji Patil Meet Devendra Fadnavis : गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आभार मानले. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण झाली आहेत.
Shivaji Patil-Devendra Fadnavis
Shivaji Patil-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai/kolhapur : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर आजपासून (ता. ०५ मे) प्रशासक मंडळ नियुक्त झाले आहे. संघावर प्रशासक आणण्याची मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी करत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते.

दरम्यान संचालक मंडळाची मुदत संपताच आजपासून गोकुळ दूध संघावर प्रशासकराज सुरू झाले आहे. प्रशासक नेमल्यानंतर चंदगडचे आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.

गोकुळमधील गैरकारभाराबाबत प्रशासक नेमण्याची आमदार पाटील यांनी मागणी केली होती. या भेटीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आमदार शिवाजी पाटील यांनी पुन्हा एकदा आरोप केले आहेत. शिवाय मंत्री मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

गोकुळ दूध संघ प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा. जर काही केलं नसेल तर मंत्री मुश्रीफ एवढे घाबरत का आहेत? असा सवाल आमदार पाटील यांनी केला आहे.

Shivaji Patil-Devendra Fadnavis
Mohite Patil Group : मोहिते पाटलांनी बोलावलेल्या बैठकीला समर्थक आमदाराची दांडी: मतभेदांच्या चर्चेला उधाण...

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेते हे मुश्रीफ यांच्या दबावाखाली आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज देण्यात आल्याने अनेक संस्था दबावाखाली आहेत. म्हणूनच गोकुळ प्रशासकाला मुश्रीफ आणि काही नेत्यांचा विरोध आहे, असा आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला.

Shivaji Patil-Devendra Fadnavis
Gokul Milk : गोकुळमध्ये 'महाडिकांना' नडले तिथंच 'मुश्रीफांचा' डाव गंडला; आबिटकरांनी टायमिंग साधून काढले उट्टे!

त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर उत्तर देईल

दरम्यान, आमदार शिवाजी पाटील यांच्या या आरोपामुळे आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापुरात बोलताना मुश्रीफांनी गोकुळमधील प्रशासकाबाबत भाष्य केले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा ज्या दिवशी निकाल लागेल, त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com