Satej Patil : मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांचा राजीनामा घेतला पाहिजे, पण घडामोडींना भाजपचाच पाठिंबा, सतेज पाटील नेमकं काय म्हणाले?

Satej Patil slams Shaktipeeth Highway plan : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात अनेक हरकती गेल्या आहेत. या महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसणार आहे. शहरातील 25 वॉर्डमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल. गरज नसलेला महामार्ग कशासाठी अशी आमची मागणी असून राज्य सरकारने याचा फेरविचार करावा, असं वक्तव्य काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.
Sanjay Shirsat, Satej Patil, Devendra fadnavis
Sanjay Shirsat, Satej Patil, Devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 12 Jul : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात अनेक हरकती गेल्या आहेत. या महामार्गामुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसणार आहे. शहरातील 25 वॉर्डमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल. गरज नसलेला महामार्ग कशासाठी अशी आमची मागणी असून राज्य सरकारने याचा फेरविचार करावा, असं वक्तव्य काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे.

शिवाय महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कायम सुरू राहणार. आमची आणि शेतकऱ्यांची भूमिका ठाम असल्याचंही त्यांनी सरकारला सुनावलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्याज परतावा मिळत नाही. 2024 ला शिक्षकांचा जीआर काढून सुद्धा त्यांना ती सवलत मिळत नाही. मात्र, शक्तिपीठ महामार्गला अट्टाहास का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला, ते कोल्हापुरात बोलत होते.

Sanjay Shirsat, Satej Patil, Devendra fadnavis
Maharashtra Political Live : राजकारणातला एक संजय दुसऱ्या संजयला आता कोर्टात खेचणार

जनसुरक्षा विधेयकावरून बोलताना सतेज पाटील यांनी, महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांसोबत या कायद्यासंदर्भात पाच बैठक झाल्या. तर त्यातील तीन बैठकांमध्ये आम्ही विरोध असलेल्या गोष्टी सांगितल्याचं स्पष्ट केलं. तसंच नक्षलवादचा बीमोड झाला पाहिजे त्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे.

पण डाव्या संघटनांवर कारवाई होत असेल तर आमचा आक्षेप आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा सांगतात, आमच्यामुळे 72 टक्के नक्षलवाद संपला. पण पोलिस, सीआरएफ मुळे हा नक्षलवाद संपला आहे. विधेयकाबाबत चर्चा करण्यासाठी 24 ला अंतिम बैठक होती. पण ती 26 ला घेण्यात आली. 26 जूनला शाहू जयंती असल्याने ती बैठक पुढे घ्यावी अशी मागणी आमची होती.

25 किंवा 29 ला घेण्याची विनंती केली. मात्र तत्पूर्वी हा कायदा सभागृहात आला, असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. जे कृत्य केले ते समोर आले, हे महायुतीतील अंतर्गत राजकारण आहे की नाही याची कल्पना नाही. पण ज्या काही घटना झाल्या त्या बाबतीत गुन्हा नोंद करण्यास प्रशासनावर दबाव आहे.

Sanjay Shirsat, Satej Patil, Devendra fadnavis
Nilesh Lanke Shirdi Road : गडकरींना लाज वाटतेय, त्याच रस्त्यासाठी पवारांच्या शिलेदाराचं उपोषण; मंत्री विखेंच्या बैठकीवर लंकेंचा निशाणा

संजय शिरसाट यांचा भयानक व्हिडिओ समोर आला त्यात पैशाची बॅग स्पष्ट दिसते. सीबीआय याची चौकशी करणार का? पैशाचे गठ्ठे दिसत आहेत. ते जर कपडे आहेत म्हणत असतील तर याहून मोठा विनोद नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतला पाहिजे, अशीही मागणी आमदार पाटील यांनी केली.

ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याला भाजपचाच पाठिंबा आहे. आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही. हा आत्मविश्वास असल्यानेच अशी प्रकरण पुढे येत आहेत असे सांगत अनेक आमदार आपल्या मतदारसंघातील विषय सांगत असतात.

पण आमदार काही बोलू देत आता मंत्र्यांचे स्टॅंडर्ड उत्तर असते. कॅबिनेट मंत्री नसल्यामुळे सभागृह दोन वेळा बंद ठेवायची वेळ आली. विधान परिषदेमध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, ती देखील उपस्थिती नसते. आम्ही निदर्शनास आणून दिल्यानंतर कॅबिनेट मंत्री आले. पाशवी बहुमत मिळालेले सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com