Satej Patil : 'आबिटकर, मुश्रीफांची नाराजी असेल तर हतबलता...', सतेज पाटलांनी कळीचा मुद्दा काढला!

Shaktipith Highway Satej Patil Slams Hasan Mushri Prakash Abitkar : अनेक मंत्री एकमेकांच्या विरोध बोलताना दिसत आहे. दोन्ही पक्षाचे हतबलता वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून दिसत येत असल्याची टीका देखील सतेज पाटील यांनी केली.
Satej Patil - Hasan Mushrif
Satej Patil - Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Satej Patil Politics : मंत्रिमंडळाच्या नुकताच्य झालेल्या बैठकीत शक्तिपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. शक्तिपिठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी या मार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर महामार्ग करणार नसल्याचे महायुती सरकारने सांगितले होते. मात्र, हा महामार्गाला मंजुरी दिल्याने काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची भूमिका तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती.मात्र ही घोषणा केवळ मतासाठी होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. गरज नसलेला महामार्ग, शेतकऱ्यांच्या माथी लागू नका. सरकारला विनंती आहे. जर पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री मुश्रीफ यांची नाराजी असेल तर राज्याच्या प्रकल्पावर दोन्ही पक्षांची हतबलता आहे. हे यावरून स्पष्ट होते, असे सतेज पाटील म्हणाले.

अनेक मंत्री एकमेकांच्या विरोध बोलताना दिसत आहे. दोन्ही पक्षाचे हतबलता वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून दिसत येत असल्याची टीका देखील पाटील यांनी केली.

राज्यातील कारखान्यांना दिलेल्या पैशावरून पाटील म्हणाले की,राज्य सरकारला माझी विनंती आहे जे एनसीडीसी कडून पैसे आलेले आहेत सरकारने त्याची गॅरंटी घेतलेली आहे. मात्र त्याचे व्याज देखील काही कारखान्यांनी भरलेले नाही. 200 कोटी कर्ज घेऊन देखील 75 हजार क्रशिंग काही कारखान्यांनी केलेले नाही. शासनाचा पैसा नेमका कुठे खर्च होतो त्याचं दायित्व कोणाला आहे की नाही?

Satej Patil - Hasan Mushrif
Babanrao Lonikar Controversy Statement : जीभ घसरलेल्या बबनराव लोणीकरांवर सुषमा अंधारेंचा प्रहार; म्हणाल्या, 'लाचार...'

एकाच कारखान्याबद्दल विचार न करता इंडस्ट्री ही राज्याची आहे. राज्यातील सर्व साखर कारखाने हे शेतकऱ्यांसाठी काम करतात.. सर्वांना धरून धोरण झाले तर राज्याचे त्याचा विचार केला हे सिद्ध होईल, असे देखील त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या हद्दवाढीवर बोलताना ते म्हणाले, सत्ताधारी लोकांनी हा निर्णय घ्यायचा आहे. ते काय करणार आहेत याशिवाय आम्ही तर बोलून काय उपयोग आहे.

Satej Patil - Hasan Mushrif
Babanrao Lonikar : बबनराव, जरा भान ठेवा... तुमच्या अंगावरील कपडे, बूट अन्‌ गाडीतील पेट्रोलही जनतेचेच! दानवेंनी लोणीकरांना ठणकावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com