Satej Patil Politics : सतेज पाटलांनी लंगोट बांधला, मैदानही मारणार; शड्डू ठोकत म्हणाले, 'तर लढाई मलाच...'

Satej Patil Rahul Patil Local Body Elections : राहुल पाटील, राजेश पाटील हे काँग्रेससोबत राहिले तर करवीरची जबाबदारी त्यांच्यावर असेल, असे सतेज पाटलांनी स्पष्ट केले.
satej Patil
satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Satej Patil News : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची धुळधाण उडाली. एकाही जागेवर पक्षाला विजय मिळवता आला नाही. त्यातच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असून माजी आमदार पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील, राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर आहेत. राहुल पाटील विधानसभा निवडणुकीत करवीरमधून उमेदवार होते. मात्र तेच आता साथ सोडून जाण्याच्या तयारीत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात एकामागून एक मोठे धक्के बसत असताना सतेज पाटील हे मैदानात उतरले आहेत. राहुल पाटील, राजेश पाटील यांनी पक्ष सोडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. हे आवाहन करत असताना त्यांचा जाण्याचा निर्णय ठाम असल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून ती लढाई मलाच लढावी लागेल, असे म्हणत सतेज पाटली शड्डू ठोकत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

काँग्रेस कमिटीच्या जिल्हा आणि शहर कार्यालयात जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर, कुडित्रे आणि शिये मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी घेतलेल्या बैठकीत सतेज पाटील यांनी जे सोबत असतील त्यांना घेऊन लढणार असल्याचे स्पष्टच सांगितले.

satej Patil
Gotya Gitte Video : 'वाल्मिक कराड दैवत, तू वंजारी नाहीस...', फरार गोट्या गित्तेच्या व्हिडिओने खळबळ!

राहुल पाटील, राजेश पाटील हे काँग्रेससोबत राहिले तर करवीरची जबाबदारी त्यांच्यावर असेल हे स्पष्ट केले मात्र जर त्यांचा जाण्याचा निर्णय ठाम असेल तर आपणच मैदानात उतरून आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी घेऊ, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

काँग्रसेसोबत राहिले पाहिजे...

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडत त्यावेळी दिग्विजय खानविलकर, हसन मुश्रीफ हे काँग्रेसमधून राष्ट्रवादी पक्षात गेले. मात्र, दिवंगत आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेससोबत एकनिष्ठ आणि ठामपणे राहिले. शेवटपर्यंत ते काँग्रेससोबतच होते. त्यांच्या निष्ठेचा आदर्श राहुल, राजेश पाटील यांनी घ्यावा, असे आवाहन देखील सतेज पाटलांनी केले.

satej Patil
Maharashtra Minister Viral Video : 'पगार कोण देतं, कानाखाली मारेल...'; कोकाटेंनंतर रोहित पवारांनी आणखी एका मंत्र्याचा व्हिडिओ दाखवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com