Maharashtra Minister Viral Video : 'पगार कोण देतं, कानाखाली मारेल...'; कोकाटेंनंतर रोहित पवारांनी आणखी एका मंत्र्याचा व्हिडिओ दाखवला

Rohit Pawar Meghana Bordikar : मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला खडसावताना म्हणाल्या की, चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राखा. काय काम करतो मला माहिती नाही का.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Meghana Bordikar Video : विधीमंडळात मोबाईलवर पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केला होता. या व्हिडिओनंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटेंचे कृषिखाते काढून त्यांना क्रिडा खात्याची जबाबदारी देण्यात आली. आता रोहित पवारांनी आणखी एका मंत्र्याचा व्हिडिओ ट्विटरवरून पोस्ट केला आहे.

भाजपच्या राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी देत असलेला हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत त्या म्हणताना दिसत आहे की, 'असं कुणाचं काम केलं ना तर याद राख कानाखाली घालील, हा मेघना बोर्डीकरचा शब्द आहे. पगार कोण देतं? असली चमकोगिरी बिलकूल चालणार नाही. आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकील.

सोडून दे नोकरी...

मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला खडसावताना म्हणाल्या की, चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राखा. काय काम करतो मला माहिती नाही का. मी मुद्दाम सीईओ मॅडमला इथे बोलावलं आहे. हमली करायची ना तर सोडून दे नोकरी.'

रोहित पवार काय म्हणाले?

सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे…आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची, असा टोला रोहित पवार यांनी मेघना बोर्डीकर यांना लगावला आहे.

Rohit Pawar
Sunil Tatkare : रायगडमध्ये तटकरे वादळ! शिवसेनेच्या गोटातच धडाकेबाज डाव!

महाराष्ट्राची बेअब्र होतोय

सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?

देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा, असे आवाहन रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण

बोर्डीकर यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. अर्धवट माहितीच्या आधारे दिशाभूल करू नका, असे त्या रोहित पवारांना म्हटल्या आहे. तो ग्रामसेवक विधमा महिलांचा छळ करतो, मोलमजूरी करणाऱ्या महिलांकडे आवाज योजनेसाठी पैशाची मागणी करतो.त्याच्याविषयी तक्रारी आल्या होत्या. त्या रागातून त्याला ज्या भाषेत कळते त्या भाषेत समज दिली.

Rohit Pawar
Sanjay Shirsat controversy : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जातेय? संजय शिरसाटांचे पुन्हा वादग्रस्त विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com