गोकुळच्या निवडणुकीत महाडिकांबरोबर असलेले सत्यजित सरूडकर आता सतेज पाटलांच्या पाठीशी

पदाधिकारी निवडीत महाविकास आघाडीला ४१ मते मिळाली होती, त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना यापेक्षा जादा मतदान देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
Mahavikas Ahgadi Leader
Mahavikas Ahgadi LeaderSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर विधान परिषदेसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निवडणूक नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या वेळी प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथील मतदाराची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले. गोकुळच्या निवडणुकीत विरोधात गेलेले माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे विधान परिषद निवडणुकीत महविकास आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले. (Satyajit Patil Sarudkar's support to Satej Patil in the Legislative Council elections)

विधान परिषद निवडणुकीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री पाटील हे आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. दरम्यान सायंकाळी पाच वाजता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये निवडणुकीचे नियोजन कसे राहणार, कोणत्या नेत्यावर काय जबाबदारी सोपवायची, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत शनिवारपासून (ता. १३ नोव्हेंबर) तालुकावार मतदारांच्या भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.

Mahavikas Ahgadi Leader
सतेज पाटलांना एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली रंगतदार : महाडिकांच्या घरातीलच उमेदवार!

बैठकीस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदीता माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, गोकुळचे संचालक डॉ सुजित मिणचेकर उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

Mahavikas Ahgadi Leader
महादेवराव महाडिक लागले कामाला : जयसिंगपुरात जाऊन घेतली राज्यमंत्री यड्रावकरांची भेट

आजी-माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक

जिल्‍हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या आजी, माजी पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या (ता. १२ नोव्हेंबर) अजिंक्यतारा येथे होणार आहे. निवडणुकीत सर्वाधिक मतदान जिल्‍हा परिषदेचे आहे. त्यामुळे पक्षीय बलाबल, मतदान, संपर्क आदीवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मंत्री पाटील यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही झाली. आता प्रत्येक स्थानिक स्‍वराज्य संस्‍थेतील मतदाराशी संपर्क साधण्याचे नियोजन केले. निवडणुकीत जिल्‍हा परिषदेचे सर्वाधिक म्‍हणजे ६५ मतदार आहेत. पदाधिकारी निवडीत महाविकास आघाडीला ४१ मते मिळाली होती, त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना यापेक्षा जादा मतदान देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच दिवाळीचे औचित्य साधून मतदार संपर्क अभियान राबवले. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुसऱ्यांदा संपर्क केला जाणार आहे.

Mahavikas Ahgadi Leader
आमदार सावंतांना जिल्हा बॅंकेत `एंट्री` की `नो एंट्री` : जतमध्ये रंगले नाट्य

जिल्‍हा परिषद मतदारांशी तालुकानिहाय संपर्क केला जाणार आहे. यामध्ये आजी-.माजी पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. यासाठीचे नियोजन करण्यासाठी उद्या (ता. १२) बैठक होत आहे. यामध्ये आजी माजी पदाधिकारी, प्रमुख सदस्य व गटाचे प्रमुख या बैठकीस उपस्‍थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com