आमदार सावंतांना जिल्हा बॅंकेत `एंट्री` की `नो एंट्री` : जतमध्ये रंगले नाट्य

सांगली जिल्हा बॅंकेसाठी (Sangli DCC Bank election) जत तालुक्यातील निवडणूक सर्वाधिक चर्चेची!
vikram sawant
vikram sawantSarkarnama
Published on
Updated on

जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी जत तालुक्यात मोठे नाट्य घडणार आहे. निवडणुकीची प्रत्यक्षातील नाट्यसंहिता आणि अंतिमतः रंगमंचावर सादर होणारी संहिता यात मोठी तफावत असेल. या नाटकात सहभागी सर्व कलावंत नेमून दिलेल्या भूमिका करतील याची शाश्‍वती नाही. त्यामुळे ही स्टोरी नक्की रंजक असेल.

महाविकास आघाडीकडून सोसायटी गटात आमदार विक्रमसिंह सावंत विरूद्ध नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले पण आता भाजपचे उमेदवार झालेले प्रकाश जमदाडे या लढतच्या क्लायमॅक्सकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटातील ८६ मतदार भवितव्य ठरवणार आहेत.

vikram sawant
सांगली जिल्हा बॅंकेसाठी एवढी मारामारी झाली... तरी आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध!

राष्ट्रवादीचे जमदाडे भाजपचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचा राज्यातील मित्र पक्ष हा काँग्रेस आहे. या उलट जतमध्ये राष्ट्रवादी, भाजप मित्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कोणत्या नैसर्गिक नियमाने चालणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जतच्या सोसायटी गटाची ही पटकथा अधिकाधिक रंजक होत जाणार आहे. आता जतच्या या "स्टोरी" चा लेखक कोण याबद्दल राजकीय वर्तुळात आहे.

सोसायटी गटात गेल्यावेळी त्यावेळचे आमदार विलासराव जगताप यांचे पुत्र सध्याचे पंचायत समिती सभापती मनोज जगताप यांचा पराभव करून आमदार सावंत यांनी काँग्रेसची विजयी घोडदौड सुरू ठेवली. शिवाय, भाजपचा गड मोडीत काढत विधानसभेला विलासराव जगताप यांचा पराभव केला. यानिमित्ताने प्रकाश जमदाडे यांना पुढे करीत त्या  दोन्ही पराभवाचे उट्टे काढण्यासाठी विलासरावांनी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी जमदाडे यांच्याबरोबर दोन पाऊले मागे येत हातमिळवणी केली आहे.

vikram sawant
राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या सांगली जिल्हा महिला अध्यक्षा राष्ट्रवादीच्या वाटेवर

जमदाडे यांना जगताप यांनी बाजार समितीच्या सभापती पदाची संधी देत राजकीय बळ दिले. मात्र त्या जमदाडे यांनी जगताप यांच्याशी फारकत घेत भाजपमध्ये राहून खासदार गटाला जवळ केले. त्यातून खासदार संजय पाटील यांच्याशी जगतापांचे वाजले. अलीकडेच जमदाडे राष्ट्रवादीत दाखल झाले होते. आता त्यांनी क्षणात राष्ट्रवादीत राहत भाजपच्या शेतकरी विकास पॅनलची उमेदवारी स्वीकारली. या खेळाला सावंतांचे प्रत्युत्तर कसे याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com