Congress News : सत्यजीत तांबेंना विधानसभा लढवायची होती, एबी फॉर्म योग्यच होता : काँग्रेसचा गौप्यस्फोट

Satyajeet Tambe : "मला पक्षाकीडून चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले."
Congress News : Satyajeet Tambe
Congress News : Satyajeet TambeSarkarnama

Congress News : काँग्रेसचे माजी नेते व नाशिक पदवीधर मतदारसंघातले नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला पक्षाकीडून चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. तसेच आपल्या बदनामीचं षडयंत्र रचले गेले, असे तांबे म्हणाले. तांबेच्या या आरोपावर आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सत्यजीत तांबेना उत्तर दिले आहे. “माझ्या वडिलांच्या जागेवर मी का लढावं?, असं सत्यजीत तांबे बोलले असल्याचा दावा लोंढेंनी केला. तांबे यांना फॉर्म उशिरा मिळाला, असं त्यांनी आपल्याला कधीच सांगितलेलं नाही, असेही लोंढे म्हणाले.

फॉर्म स्वीकारल्यानंतर सत्यजीत यांनी आपल्याला 'ओके' असं उत्तर पाठवंल होतं”, असं अतुल लोंढे यांनी म्हंटले आहे. तसेच सत्यजीत मला सहा महिन्यांपूर्वी बोलले होते की, "मी माझ्या वडिलांच्या जागेवर का निवडणूक लढूवू? मी लढवली तर विधानसभाच लढवेन,” असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे.

Congress News : Satyajeet Tambe
Harshvardhan Jadhav News : राजकारणात काही नको म्हणणारे जाधव अचानक विधानसभेच्या तयारीला ? हे आहे कारण..

"सत्यजीत तांबे यांनी काय बोलावं की, 'मी भाजपने मला मतं द्यावी?' आमचे शीर्षस्थ नेते राहुल गांधी एकीकडे वैचारिक लढा देत आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे काँग्रेसवर निष्ठा असलेली व्यक्ती म्हणते की, मला भाजपने मतं द्यावी. हे मान्य तरी होऊ शकेल का?”, असे लोंढे म्हणाले.

Congress News : Satyajeet Tambe
Nana Patole : 'तांबेंचा हायव्होल्टेज ड्रामा, माझ्याकडे ही खूप 'मसाला' : पटोलेंचा सूचक इशारा!

"दुसरी गोष्ट म्हणजे, ज्या गोष्टी पक्षाच्या अंतर्गत व्हायला हवे, त्या पक्षाच्या आतच व्हायला हव्यात. यावर मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून प्रतिक्रिया दिली नव्हती. पण पक्षावर गंभीर आरोप होत असताना लोकांसमोर खरी परिस्थिती यावी, यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका मी मांडत आहे," असं अतुल लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com