Akkalkot News: भाजपचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांचे निधन

BJP : तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते
Dattatraya Tanwade
Dattatraya TanwadeSarkarnama

Dattatraya Tanwade: अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे यांचे कनिष्ठ बंधू दत्तात्रय शरणप्पा तानवडे यांचे मंगळवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या एक महिन्यापासून पुणे व सोलापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज (ता.24 जानेवारी) सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

Dattatraya Tanwade
Cabinet Expansion News : सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडून शिंदे-फडणवीसांना निमंत्रणच नव्हतं!

उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता शिरशी येथील वागदरी- अक्कलकोट रोड लगत असलेल्या तानवडे मळ्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात प्रशांत, प्रवीण असे दोन मुले, प्राजक्ता एक मुलगी आणि पत्नी निर्मला व सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे माजी जिल्हा परिषद (Zilla Parishad) सदस्य आनंद तानवडे व युवा मोर्चाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रसन्न तानवडे यांचे ते काका होते.

Dattatraya Tanwade
Cabinet expansion News : फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शिरसाट, कडू अ्न गोगावलेंच्या आशा पल्लवित

अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे ते सर्वात जुने व ज्येष्ठ नेते होते. दहिटणे येथील स्वामी समर्थ कारखान्याचे संस्थापक संचालक होते. काही काळ भूविकास बँकेचे ते राज्य संचालक होते. भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य देखील होते. तसेच अक्कलकोट बाजार समितीचे सभापतीपद हे २००२ ते २००४ या कालावधीमध्ये त्यांनी भूषविले होते. त्यानंतर पुन्हा २००४ साली त्यांनी श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे उपाध्यक्षपद देखील भूषवले होते.

Dattatraya Tanwade
Mass Suicide in Daund : 'त्या' सात जणांच्या आत्महत्येमागचं धक्कादायक कारण आलं समोर

तालुक्याच्या राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण होता. २५ जानेवारी १९९८ साली आमदार बाबासाहेब तानवडे यांचे ज्यावेळी अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांनी अक्कलकोट भाजपची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे (Babasaheb Tanwade) यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com