BJP Leader Arrested : भाजपचे बडे नेते वसंत लोढा यांना सातारा पोलिसांनी घेतले ताब्यात; काय आहे प्रकरण?

Ahmednagar Politics : पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमनपदी वसंत लोढा आहेत.
BJP Leader Arrested
BJP Leader ArrestedSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा (Vasanat Lodha) यांना लोणंद (सातारा) पोलिसांनी एका खाजगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल रात्री उशिरा करण्यात आली. तत्पूर्वी सातारा पोलिसांच्या लोणंद पोलिसांच्या पथकाने लोढा यांच्या निवासस्थानी चौकशी केल्याचे समजते. त्यानंतर लोढा यांना ताब्यात घेतल्याचे कळत असून या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील कपाशी येथील शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली असून, यात लोढा यांच्यासह एक ठेकेदार तसेच शरयू इंडस्ट्रीज लि. चे तीन इंजिनिअर सहभागी असल्याच्या तक्रारीवरून लोणंद पोलिसांत एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. कारखान्याचे संचालक अविनाश शिवाजी भापकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

BJP Leader Arrested
Congress And BJP : थोरात की शिंदे ! कुणाच्या नावाने नगर जिल्ह्याला 'गिफ्ट' मिळणार ?

शरयु अँग्रो इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये इंजिनिअरींगची विविध प्रकारच्या कामांचा करार सन 2021 मध्ये फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अॅक्युरेट इंजिनिअरींग अण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांच्या सोबत करण्यात आला होता. करारावेळी कोटेशनबरोबर वरील दोन्ही आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असल्याबाबतचे शासनाचे शिक्के व सह्या असलेले दाखले जोडलेले दिले होते.

BJP Leader Arrested
Ahmednagar News : अजितदादांमुळे निर्णय प्रक्रियेला गती; आमचा संसारही उत्तम चाललाय : विखे पाटील मोजक्या शब्दांत नेमके बोलले

वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्यांना मोठी रक्कम अदा करण्यात आली. परंतु फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा व अँक्युरेट इंजिनिअरींग अॅण्ड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा यांनी कंपनीचे वर्क ऑर्डरप्रमाणे काम केले नाही व कामास टाळाटाळ करु लागले. त्यावेळी आम्ही वसंत लोढा व प्रसाद आण्णा यांनी दिलेली कागदपत्रे तपासली असता ती कागदपत्रे बनावट, खोटे व तयार केलेले असल्याचे लक्षात आले आहे. वरील दोघांनीही महाराष्ट्र शासनाचे व वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी, कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्के तयार करुन त्याचा दुरुपयोग व फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

तसेच या फसवणूक प्रकरणात केलेल्या कामांची तपासणी केली असता कंपनीमध्ये बाहेरुन नवीन साहित्य आलेले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसेच गेटवरील इनवर्ड आऊटवर्ड वहीतील नोंदीवरुन दिसून येत आहे. कंपनीमधील संतोष पोपटराव होले (सिनिअर इंजिनीअर), महादेव अनंत भंडारे (चिफ इंजिनिअर), संजय अनिरुद्ध मुळे (सिनिअर इंजिनिअर) यांना पैशाचे आमिष देऊन कंपनीमधील मशिनरी व साहित्य, पॅनल बॉक्स, पाईप हे सर्व नवीन टाकले आहे. तसेच नवीन काम केले, असे भासवून वसंत लोढा आणि प्रसाद आण्णा यांनी फसवणूक केल्याची तक्रार आहे.

BJP Leader Arrested
Ahmednagar Politics: नगर शहरात सुविधांचा बोजवारा; सेनेकडून आयुक्तांना कंदील भेट, तर मनसेकडून चिखलात खुर्ची टाकून निषेध

कंपनीची फसवणूक केलेली रक्कम त्यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी सदरची रक्कम कंपनीमध्ये जमा केलेली नसल्याने अखेर कंपनीने या सर्वांवर भादवी कलम ३४, ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१ नुसार फसवणूकीचा गुन्हा लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. लोणंद, सातारा पोलिसांनी अहमदनगर शहरात येऊन कोतवाली पोलिसांच्या मदतीने अहमदनगर मधील वसंत लोढा यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com