Congress And BJP : थोरात की शिंदे ! कुणाच्या नावाने नगर जिल्ह्याला 'गिफ्ट' मिळणार ?

Balasaheb Thorat And Ram Shinde : विरोध पक्षनेते अन् विधानसभेच्या सभापतिपदाच्या निवडीकडे लक्ष
Balasaheb Thorat, Ram Shinde
Balasaheb Thorat, Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : विरोधी पक्षनेत्याविनाच अधिवेशनचा पहिला आठवडा पार पडला आहे. या काळात राज्यातील विविध प्रश्नांसह किरीट सोमय्या, कांदा अनुदान, पुरवणी अर्थसंकल्प निधी वाटप आदी विषय गाजले. दरम्यान, रिक्त असलेले विरोधीपक्ष नेतेपद, विधानपरिषद सभापतीपद यासाठीही मोर्चेबांधणी सुरू झाल्याने यावर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात निर्णय होण्याची अपेक्षा असून अहमदनगर जिल्ह्याला यानिमित्त 'गिफ्ट' मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Latest Political News)

Balasaheb Thorat, Ram Shinde
Ajit Pawar News : 'अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांचीही इच्छा'; मिटकरींच्या दाव्याला बड्या नेत्याचाही दुजोरा

अहमदनगर जिल्ह्यातील दोन पक्षांच्या दोन नेत्यांची नावे सध्या चर्चेत आल्याने जिल्ह्यालाही याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे. अजित पवार आपल्या मोठ्या गटासह सरकारमधे सहभागी झाल्याने विरोधीपक्ष नेतेपद ४४ आमदार असलेल्या काँग्रेस पक्षाकडे जाणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्याबाबत महाविकास आघाडीतही स्पष्टता आहे.

या पदासाठी भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नावांची चर्चा आहे. तर विधानपरिषद सभापतिपदासाठी रामराजे निंबाळकर आणि राम शिंदे यांची नावे भाजपकडून आघाडीवर आहेत. थोरात-शिंदे यांची नावे स्पर्धेत असल्याने नगर जिल्ह्याचे या निवडींकडे लक्ष लागले आहे. यातील नावावर शिक्कामोर्तब करताना पक्षाकडून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची किनार असणार आहे.

Balasaheb Thorat, Ram Shinde
MNS Nashik Toll Plaza: मनसे कार्यकर्त्यांना तोडफोड भोवली; आठ जणांना अटक, फरारींचा शोध सुरू

कर्जत-जामखेड मतदारसंघातुन २००९ आणि २०१४ असे सलग दोनदा राम शिंदे भाजपकडून निवडून आले. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवारांनी पराभव केल्यानंतर पक्षाने शिंदेंना ताकद देण्यासाठी विधानपरिषदेवर घेतले. दरम्यान, राम शिंदे २०२४ साठी नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी इच्छुक असून त्यांनी जाहीर इच्छाही पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. आजही ही मागणी कायम असल्याचे शिंदेंनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केली आहे.

शिंदेंनी विधानपरिषद सभापतीपदासाठी आपले नाव चर्चेत असल्याचे सांगताना याच पावसाळी सत्रात यावर निर्णय होणार असल्याचे स्पष्ट केले. यावर पक्ष निर्णय घेईन असेही ते म्हणाले. त्यामुळे राम शिंदेंना सभापतिपदावर घेत खासदार सुजय विखे यांची २०२४ ची लोकसभेची वाट मोकळी करायची की इच्छेनुसार शिंदेंचा लोकसभा उमेदवारीचा मार्ग कायम ठेवायचा याबाबत सभापतिपदाच्या निवडीनंतरच स्पष्टता येणार आहे.

Balasaheb Thorat, Ram Shinde
Eknath Shinde News: पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंना भेटून निरोप दिला; 'या' खासदाराच्या दाव्याने खळबळ

विरोधीपक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून अभ्यासू आणि ज्येष्ठ असेलले बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. सभागृहाच्या कामकाजात पहिल्या आठवड्यात त्यांनी विविध मुद्यांना आक्रमकपणे हात घालत सत्ताधारी पक्ष्याला अडचणीत आणल्याचे दिसून आले. मात्र त्याच बरोबर संग्राम थोपटे यांनी २५ ते ३० काँग्रेस आमदारांचा आपल्याला पाठिंबा असून आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे उघडपणे सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असताना आता विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार हे आठवड्यात स्पष्ट होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com