Solapur Dcc Bank : 11 वेळा आमदार झालेल्या गणपतआबांच्या नातवांच्या वेगळ्या राजकीय वाट्या; आमदार देशमुख भाजपसोबत, तर दुसरा मोहिते पाटलांच्या पॅनेलमध्ये...

Dr. Babasaheb Deshmukh-Dr. Aniket Deshmukh : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे दोन नातू वेगवेगळ्या पॅनेलमधून लढत आहेत. त्यामुळे सांगोल्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Dr. Babasaheb Deshmukh- Ganpatrao Deshmukh-Dr. Aniket Deshmukh
Dr. Babasaheb Deshmukh- Ganpatrao Deshmukh-Dr. Aniket DeshmukhSarkatnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 19 November : राजकारणात विचारधारा, पक्षनिष्ठा आणि राजकीय वारसा यांना विशेष महत्त्व असते. मात्र सहकार क्षेत्रात पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात राजकीय समीकरणे वेगळीच दिसतात. याचा प्रत्यय सध्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत येत आहे. अकरा वेळा आमदार राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते (स्व.) गणपतराव देशमुख यांचे दोन नातू दोन वेगवेगळ्या पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात या लढतींची विशेष चर्चा आहे.

(स्व.) गणपतराव देशमुख म्हणजे सांगोल्याच्या राजकारणातील एक स्वतंत्र पर्व. एकाच पक्षातून तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून जाण्याचा विक्रम त्यांनी केला. साधी राहणी, अभ्यासपूर्ण भूमिका आणि शेतकरी-कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या याच राजकीय वारशाची चर्चा आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भाजपप्रणीत पॅनेलमधील १९ पैकी १० संचालक बिनविरोध निवडून आले असून, उर्वरित जागांसाठी निवडणुकीची चुरस कायम आहे. या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील तीन उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू आणि विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे भाजपप्रणीत आघाडीकडून सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात संजय इंगोले यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पाठिंबा दिला आहे.

दुसरीकडे, गणपतराव देशमुख यांचेच नातू डॉ. अनिकेत देशमुख हे भटक्या-विमुक्त जाती मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात श्रीधर कोंडले आणि राजेंद्र बंदिछोडे हे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे, गणपतराव देशमुख यांच्या राजकीय वारशाशी जोडलेले हे दोन्ही नातू एकाच निवडणुकीत दोन वेगवेगळ्या पॅनेलमधून आपापली राजकीय भूमिका मांडत आहेत.

डॉ. अनिकेत देशमुख यांनी यापूर्वी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी अल्पशा मतांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२४ मध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला. त्या निवडणुकीत दोघेही एकत्रितपणे दिसले होते. मात्र आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचे राजकीय मार्ग वेगवेगळ्या पॅनेलमधून जात असल्याचे चित्र आहे.

Dr. Babasaheb Deshmukh- Ganpatrao Deshmukh-Dr. Aniket Deshmukh
Satara DCC Bank: शिवसेनेनं 'झेडपी'तला वचपा जिल्हा बँकेत काढला,भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी; शिवेंद्रराजेंनी जयकुमार गोरेंना ऐकवलं

गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर जपलेली राजकीय विचारधारा, त्यांचा पक्षाशी असलेला दीर्घकालीन संबंध आणि त्यांच्या पुढील पिढीतील बदलती राजकीय समीकरणे, या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

सहकाराच्या निवडणुकीत उमेदवारांची पात्रता, संस्थांचे हित आणि सहकाराचे प्रश्न महत्त्वाचे असले, तरी पॅनेलच्या राजकीय पाठबळाची चर्चा अधिक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ संचालक निवडीपुरती न राहता सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

विधान परिषदेपासून वेगळ्या वाटा

नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतही (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या दोन्ही नातवांच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या दिसून आल्या होत्या. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले होते, तर डॉ. अनिकेत देशमुख यांनी भाजपविरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिसणारी वेगवेगळी राजकीय वाटचाल ही केवळ याच निवडणुतीपुरती मर्यादित नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Dr. Babasaheb Deshmukh- Ganpatrao Deshmukh-Dr. Aniket Deshmukh
Satara District Bank : साताऱ्यात महायुतीत ठरलं काही, घडलं वेगळंच! अध्यक्ष निवडीनंतर भाजपच्या माजी खासदारांनी व्यक्त केली खंत

गणपतराव देशमुखांनी राजकारणात ११ वेळा विजयाचा विक्रम केला. मात्र, त्यांच्या पुढील पिढीतील दोन नातू आता सहकाराच्या निवडणुकीत दोन वेगवेगळ्या राजकीय वाटांवर उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीत केवळ उमेदवारांचीच नव्हे, तर राजकीय वारशाच्या बदलत्या प्रवासाचीही चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.