Satara DCC Bank: शिवसेनेनं 'झेडपी'तला वचपा जिल्हा बँकेत काढला,भाजपमध्ये वादाची पहिली ठिणगी; शिवेंद्रराजेंनी जयकुमार गोरेंना ऐकवलं

BJP Politics : शिवसेनेनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळचा वचपा आता सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यानंतर आता भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जयकुमार गोरेंना टोला लगावत सर्व घडामोडींवर रोखठोक भाष्य केलं आहे.
shivendraraje bhosale
shivendraraje bhosaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News: पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक उदयसिंह पाटील निंबाळकर तर,व्हाईस चेअरमनपदावर शिवसेनेच्या दीपक चव्हाण यांची निवड झाली. या निवडणुकीत शिवसेनेनं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळचा वचपा आता सातारा जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यानंतर आता भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जयकुमार गोरेंना टोला लगावत सर्व घडामोडींवर रोखठोक भाष्य केलं आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे यांच्यात धुसफुस समोर येत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची पूर्ण कमान सांभाळलेल्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मंत्री जयकुमार गोरे या भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. या चर्चांना शिवेंद्रसिंहराजे यांच्या वक्तव्यामुळे आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.

झालं तर आमच्यामुळे आणि नाही झालं तर बाबांमुळे (शिवेंद्रराजे) हे असं कसं चालेल असा टोला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जयकुमार गोरेंना टोला लगावला आहे. काही गोष्टी न बोलता मिळतात आणि काही गोष्टी आपण बोलून घालवतो हे मला कळतं असं थोडं आक्रमक विधानही त्यांनी केलं आहे.

मला वरिष्ठांनी दिलेल्या सूचना आणि निरोप मी वरिष्ठांच्यापर्यंत पोहचवले. जे निरोप वरिष्ठांनी दिले ते सुद्धा मी युतीतल्या घटक पक्षांच्या कडे पोहचवले होते. मुख्यमंत्री बोलल्या पासून आम्हाला स्पष्ट सूचना महायुतीत लढायच अशा सूचना होत्या. मी परस्पर कुठेही बैठका केल्या नाहीत कुणाशीही तडजोड करण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही शिवेंद्रराजे भोसले यांनी ठणकावून सांगितलं.

shivendraraje bhosale
Shivsena Hearing: शिंदेंच्या वकिलांचा सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यांत बाजू पलटवणारा डाव; ठाकरेंच्या मनसुब्यांवर पाणी फेरणारा दावा...

भाजप नेते शिवेंद्रराजेंनी यावेळी जिल्हा बँकेसाठी सातारचे मतदान जास्त असतानाही मी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार माघार घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या उमेदवारांवर कुरघोड्या झाल्या हे बाहेर मला फक्त मुख्यमंत्री आणि भाजप हे मला माहीत. निवडणुकीत निकालानंतर माझं नाव नाही आलं पण आज भाजपचा अध्यक्ष झाला नाही तर माझं नाव कसं पुढं येतं असा आरोपही त्यांनी केला.

आजही बँकेत माझी 750 मतं असून पण मी मुख्यमंत्री म्हणतील तसं मी कोणतीही अडचण न सांगता केलं. झालं तर त्यांचं नाव आणि नाही झालं तर माझ्यामुळं ही भूमिका योग्य नाही. जयकुमार गोरे यांनाच विचारलं पाहिजे इशारा आहे का आणि कुणाला. काही गोष्टी न बोलता मिळतात आणि काही गोष्टी आपण बोलून घालवतो हे मला कळतं.

shivendraraje bhosale
Dhiraj Deshmukh : लातूर जिल्हा बँकेत सत्ता मिळवल्यानंतर धीरज देशमुख यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा अध्यक्ष पदाची माळ?

काल मी मुंबईमध्ये होतो. तिथे ज्या मला सूचना दिल्या, त्या मी पोहचवल्या होत्या.परंतु, याऊपर जे काही झालं, ते तुम्ही पाहिलं आहे. याबाबतीत मी कुठेही बैठका केल्या नसल्याचं रोखठोक विधानही शिवेंद्रराजेंनी केली.

शिवेंद्रराजेंनी यावेळी सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत मंत्री मकरंदआबा पाटील यांच्याशी बोलणं झालं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, मी त्यांच्याशी बोललो होतो. परंतु मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष आहे, जिल्हा बँकेत आमचा असावा अशी इच्छा असल्याचं कळवलं.

shivendraraje bhosale
Ashok Chavan Audio Clip: जीवे मारण्याच्या धमकीच्या ऑडिओ क्लिपवर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; नावाचा उल्लेख मान्य करत म्हणाले...

मात्र, जिल्हा बँकेत काही गोष्टी माझ्या उमेदवारांच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न झाला. ही बँक आहे चुकीच्या कामात आक्षेप घेणे योग्य आहे. परंतु चुकीच्या पद्धतीनं काम झालं तर चांगली संस्था बदनाम होईल. राजकारणातले हेवेदावे करण्यासाठी बँकेचा वापर करू नये असे मतही भाजप नेते शिवेंद्रराजेंनी व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.