शिवसेना आमदार भाजप खासदाराला म्हणाले, ‘मंत्रिपदासाठी तुमची मोदी-शहांकडे शिफारस करतो’

कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी राज्यातील आपल्याच सरकारवर टीका केली.
Shahaji Patil -RanjitSingh Naik Nimbalkar
Shahaji Patil -RanjitSingh Naik Nimbalkar sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : आमच्या सरकारमधील कोणीही आम्हाला विचारत नाही, असे म्हणणारे सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी माढ्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांना मात्र केंद्रात मंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, मोदी-शहांकडे शिफारस करण्यासाठी मी तुमच्याबरोबर दिल्लीला येतो, अशी मिश्किल टिप्पणीही पाटील यांनी केली. (Shiv Sena MLA Shahaji Patil wishes MP Ranjit Singh Naik Nimbalkar to become a Minister!)

पंढरपूर येथील एका खासगी हाॅस्पिटलच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी खासदार निंबाळकर यांना मंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार शहाजीबापू पाटील यांचे खासदार निंबाळकर यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. पाटील म्हणाले की, नवे वर्षे सुरू झाले आहे, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे, यासाठी मी शुभेच्छा देतो. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी मला दिल्लीला जाताना सोबत घेऊन चला. पण, प्रवासाचे तिकिट मात्र तुम्ही काढा. मी त्यांच्याशी बोलतो, असे सांगून एकच धमाल उडवून दिली.

Shahaji Patil -RanjitSingh Naik Nimbalkar
परबांच्या आदेशानंतर प्रा. सावंत शिवसेनेत पुन्हा सक्रीय : पक्ष सोपवणार मोठी जबाबदारी!

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यातील आपल्याच सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला संधी मिळालेली नाही. आम्हाला कोणालाही त्यांनी घेतलेले नाही. माझं सोडा शिवसेनेतून मी पहिल्यांदा निवडून आलो आहे. मला अगोदरच सांगण्यात आलं होतं, गडबड करायची नाही, लांब बसायचे, त्यानुसार आम्ही आपलं लांब बसलो. पण, बबनदादा शिंदे यांच्यासाखे ३०-३० वर्षे निवडून आलेल्या आमदारांनाही संधी मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला वाटतं नाही की या सरकारमध्ये आमची कोणी दखल घेतील म्हणून...आमचा कोणी विचारही करायला तयार नाहीत. गप्प बसा...जावा गावाकडं, असं आम्हाला सांगितलं जातंय, असं सांगत आमदार पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली.

Shahaji Patil -RanjitSingh Naik Nimbalkar
आमदार महेश लांडगेंचा डाव अमोल कोल्हेंनी त्यांच्यावरच उलटवला!

यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत आले होते. मध्यंतरी एका साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या कार्यक्रमात साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटप करुन निवडणूक जिंकली, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याविषयी सर्वच स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार पाटील यांनी राज्य सरकारमध्ये आपणाला कोणी विचारत नाही, असे सांगत मनातील खदखद बाहेर काढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com