ShahajiBapu Patil: '...त्यांना आणखी काही कारखाने खरेदी करायचे आहेत!'; सोलापुरातून शहाजीबापूंनी तानाजी सावंतांविरोधात वात पेटवली

Solapur Politics: तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत. त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही. तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात. पाच-सहा कारखाने झालेले आहेत
ShahajiBapu Patil On Tanaji Sawant
ShahajiBapu Patil On Tanaji Sawant Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : माजी आरोग्यमंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे सध्या राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मराठवाड्यातलं राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असताना सावंतांचं असं शांत राहण्यावरुन राजकीय नेतेमंडळींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता सांगोल्याचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांनी (ShahajiBapu Patil) तानाजी सावंतांना डिवचलं आहे.

माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सोलापुरायांनी तानाजी सावंतांवर निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले,तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत. त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही. दरम्यान,तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. पण तानाजी सावंत यांची राजकारणातली एन्ट्रीच अचानकपणे झाली आणि ते बाजूलाही अगदी अचानकपणे निघून गेल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तसेच तानाजी सावंत (Tanaji Sawant) धाराशिवमधून आमदार आहेत.त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही. तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात. पाच-सहा कारखाने झालेले आहेत आणि काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत. अशा व्यापात ते गुंतल्यामुळे शिवसेना पक्ष कार्याकडे त्यांचं कमी लक्ष झालं असल्याचा चिमटाही शहाजीबापूंनी यावेळी सावंतांना काढला.

ShahajiBapu Patil On Tanaji Sawant
Radhakrishna Vikhe Patil : 'उलट आमचे अनेकांना दणके बसलेत'; '420'च्या दाखल गुन्ह्यावरून टीकेची झोड उठवणाऱ्यांवर मंत्री विखे संतापले

यावेळी शहाजीबापू पाटील यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरही कठोर शब्दांत भाष्य केलं. ते म्हणाले, निष्पाप लोकांची निर्घृणपणे केलेली ही हत्या आहे. निश्चितच भारत याचे चोख प्रत्युत्तर देईल. देशाची 140 कोटी जनता मोदींच्या पाठीमागे आहे. पाकिस्तानला याबाबतीत निश्चित धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

पाटील म्हणाले,आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिले पाऊल टाकलेले आहे.यानंतर अतिरेक्यांबाबत पाकिस्तान काय निर्णय घेते, ते पाहावा लागेल.त्यावरती भारत पुढचे पाऊल ठरवेल.युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार आहे.नरेंद्र मोदी कणखर नेतृत्व आहेत.पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचा निर्णय मोदी घेतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ShahajiBapu Patil On Tanaji Sawant
Rahul Gandhi supports caste census: काँग्रेसचा मोदींच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा; पण राहुल गांधी म्हणाले...

न्यूक्लिअर बॉम्ब जगात बऱ्याच देशांकडे आहे.न्यूक्लिअर बॉम्बची धमकी त्यांनी देऊ नये. न्यूक्लिअर बॉम्बच्याबाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा शंभरपटीने पुढे असल्याची भावनाही माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी सोलापुरात बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com