Tanaji Sawant News : तानाजी सावंतांना जे मंत्रिपद मिळालं, तेच आश्चर्यकारक...; एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं मोठं विधान

Shivsena Politics: तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत.त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही. तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात.
Eknath Shinde-Tanaji Sawant
Eknath Shinde-Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: महायुती सरकारच्या देवेंद्र फडणवीसांच्या टर्ममध्ये शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रिपदासाठी पत्ता कट करण्यात आला.यामुळे सावंत शिवसेना पक्ष आणि महायुती सरकारमध्ये जरा हात झटकूनच असल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे सावंत हे नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यायातच आता सांगोल्याचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांनी तानाजी सावंतांना (Tanaji Sawant) डिवचलं आहे.

माजी आमदार शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) हे बुधवारी (ता.30) सोलापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ला,जातनिहाय जनगणना यांसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणातील विविध घडामोडींवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी तानाजी सावंतांना शाब्दिक टोले लगावले आहेत.

शहाजीबापू म्हणाले, तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत.त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही. तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. पण तानाजी सावंत यांची राजकारणातील एन्ट्रीच अचानकपणे झाली असून ते तितक्याच अचानकपणे बाजूलाही निघून गेले असल्याचा निशाणाही त्यांनी साधला.

Eknath Shinde-Tanaji Sawant
Ashish Shelar : संजय राऊत पाकिस्तानला समर्पित अशी भूमिका घेतायेत का? आशिष शेलारांचा सवाल

पाटील म्हणाले,तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात. पाच-सहा कारखाने झालेले आहेत आणि काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत. अशा व्यापात ते गुंतल्यामुळे शिवसेना पक्ष कार्याकडे त्यांचं कमी लक्ष झालं असल्याचा खोचक टोलाही शहाजीबापूंनी यावेळी सावंतांना लगावला.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन गोळ्या मारल्या,याची सत्यता माहिती नसल्याच्या भूमिकेवरही यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, शरद पवारंनी आधी धर्माचा संबंध नसल्याचे बोललो होतो.मात्र, फडणवीससाहेबांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी आपले शब्द बदलले आहेत.

Eknath Shinde-Tanaji Sawant
Rahul Gandhi supports caste census: काँग्रेसचा मोदींच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा; पण राहुल गांधी म्हणाले...

वडेट्टीवार जे बोलत आहेत, ते विनाकारण विरोधाला विरोध करण्याचं काम आहे. वडेट्टीवारांनी हल्ल्यातील चित्रिकरण पहावे.या दहशतवाद्यांनी निवांतपणे निष्पाप लोकांना मारले आहे. अतिरेक्यांना भीती वाटण्यासारखे तेथे कोणतेही वातावरण नव्हते. गोरगरीब माणसं होती लहान मुलं होती, महिला होत्या, त्यांच्यावरती हा हल्ला झालेला असल्याचंही शहाजीबापूंनी सांगितलं.

पाटील म्हणाले, निष्पाप लोकांची निर्घृणपणे केलेली ही हत्या आहे. निश्चितच भारत याचे चोख प्रत्युत्तर देईल. देशाची 140 कोटी जनता मोदींच्या पाठीमागे आहे. पाकिस्तानला याबाबतीत निश्चित धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

Eknath Shinde-Tanaji Sawant
Waqf Bord News : आंतरराष्ट्रीय फुटबाॅल स्टेडिअमच्या स्वप्नावर पाणी; मैदानाच्या जागेवर वक्फ बोर्ड थाटणार कार्यालय!

पाटील म्हणाले, आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिले पाऊल टाकलेले आहे. यानंतर अतिरेक्यांबाबत पाकिस्तान काय निर्णय घेते, ते पाहावा लागेल. त्यावरती भारत पुढचे पाऊल ठरवेल. युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार आहे. नरेंद्र मोदी कणखर नेतृत्व आहेत. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचा निर्णय मोदी घेतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com