Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँक निवडणूक तापली : बाळासाहेब पाटील यांच्या प्रभावक्षेत्रात भाजप आमदार मनोज घोरपडेंची बाजी

Satara Dcc Bank Election 2026 : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराडच्या शहापूर विकास सोसायटीत आमदार मनोज घोरपडे गटाच्या बाजूने ठराव झाला असून बाळासाहेब पाटील गटाला धक्का मानला जात आहे.
Balasaheb Patil-Manoj Ghorpade
Balasaheb Patil-Manoj GhorpadeSarkarnama
Published on
Updated on

Karad, 04 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी ठराव घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत ठराव घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी बहुमत विरोधकांकडे असूनही सत्ताधारी भाजपने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

असाच प्रकार कराड तालुक्यात झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रभावक्षेत्रातील शहापूर विकास सोसायटीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाच्या बाजूने ठराव झाला आहे, त्यामुळे सहकारातील दिग्गज बाळासाहेब पाटलांना धक्का मानला जात आहे.

शहापूर (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटीच्या बैठकीत अध्यक्ष सर्जेराव चव्हाण यांच्या बाजूने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ठराव झाला आहे. चव्हाण हे आमदार घोरपडे समर्थक मानले जातात, त्यांच्या बाजूने ८ मते पडली असून विरोधात केवळ चार मते पडली आहेत. हा भाग माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वर्चस्वाचा मानला जातो, त्याच ठिकाणी घोरपडे यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात या ठरावाची चर्चा रंगली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या नियोजनबद्ध संपर्क मोहिमेनंतर हा ठराव मंजूर करण्यात यश आल्याचे आमदार मनोज घोरपडे समर्थकांनी सांगितले. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा प्रभाव असलेल्या शहापूरमध्ये हा ठराव घोरपडे गटाकडे वळविण्यात आण्णासाहेब जाधव, माजी उपसरपंच बाबा पाटील, कृष्णात शेलार व युवा नेते दत्तात्रेय शेलार यांची महत्वाची भूमिका असल्याचे पुढे आले आहे.

माजी अध्यक्ष दादा जाधव, राजाराम जगदाळे, शिवाजी जाधव (फौजी), अण्णा जाधव, प्रशांत जाधव, विष्णू शिरतोडे, भास्कर पाटील, तानाजी जाधव, पोपट शिरतोडे, दर्शन जाधव, पृथ्वीराज चव्हाण, दुर्वास कुंभार, भानुदास पवार, गोरख शिंदे, शिवाजी सूर्यवंशी, नीलेश शेडगे, तानाजी पाटील आणि चंद्रकांत नलवडे यांनी या प्रक्रियेत विशेष प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.

Balasaheb Patil-Manoj Ghorpade
Phaltan News : फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरला धक्काबुक्की; माजी मंत्र्याच्या ‘ओएसडी’सह दोघांवर गुन्हा

ठरावानंतर सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी आमदार मनोज घोरपडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी सोसायटीच्या उपस्थित सर्व सदस्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शहापूरच्या विकासासाठी भविष्यातही आमदार घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Balasaheb Patil-Manoj Ghorpade
Adinath Sugar Factory : 450 कोटींचा आदिनाथ अवघ्या 120 कोटींत कोणाला हवाय? : आमदार नारायण पाटलांचे ओंकार शुगरच्या बोत्रे पाटलांवर गंभीर आरोप

शहापूर सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालकांनी भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची बाजू भक्कम मानली जात आहे. त्या सर्वांना आमदार घोरपडे यांनीही ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आमदार घोरपडे यांनी सर्वांचे स्वागत करत गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com