Shahu Chhatrapati : 'छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण..' ; शाहू छत्रपतींचं राजवर्धन कदमबांडेंना प्रत्युत्तर!

Shahu Chhatrapati Vs Rajavardhan Kadambande : '...अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरु आहे, जे स्वत:ला राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात. याचे आपल्याला मनस्वी दु:ख होत आहे.' शाहू छत्रपती यांनी असंही म्हटलं आहे.
Shahu Chhatrapati Vs  Rajavardhan Kadambande
Shahu Chhatrapati Vs Rajavardhan KadambandeSarkarnama

Kolhapur Lok Sabha Constituency : कोल्हापूरात सध्या राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. कारण, आज सकाळीच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू आणि धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी कोल्हापूरात स्पेशल विमानाने दाखल होत, पत्रकारपरिषद घेत, मी शाहू महाराजांचा रक्तामासांचा वारसदार असल्याचं म्हणत आताचे शाहू हे संपत्तीचे वारसदार असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना विजयी करा असे आवाहन केले होतं.

त्यावर आता “राजर्षी शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा आणि विचारांचा मी वारसदार आहे. शाहूंचे समतावादी विचार समाजात रूजविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत, यामुळे जनतेने मला स्वीकारले तर आहेच, शिवाय वारसदार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. हिंदू कायद्यानुसार दत्तक प्रक्रिया झाल्याने मी कायदेशीर वारसदार आहे” असे पत्रक कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया आणि महाविकास आघाडी, काँग्रेसचे(Congress) उमेदवार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Chhatrapati Vs  Rajavardhan Kadambande
Rajavardhan Kadambande News : 'मी छत्रपती शाहू महाराजांचा रक्तामासाचा वारसदार, आत्ताचे शाहू हे..' ; राजवर्धन कदमबांडेंचं विधान!

शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'राजर्षी शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले. त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार झालो आहे. या प्रक्रियेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लाल बहाद्दूर शास्त्री यांनी 1956चा हिंदू कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले. '

'मी राजर्षी शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाईसाहेब उर्फ आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचा मी पूत्र आहे, म्हणजे मी राजर्षी शाहू महाराज यांचा खापर पणतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे.'

Shahu Chhatrapati Vs  Rajavardhan Kadambande
Aditya Thackeray News : 'भाजप जिंकणार नाही, मात्र चुकून जिंकली तर ...' आदित्य ठाकरेंचं कोल्हापूरात मोठं विधान!

तसेच 'दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याच बरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. गेल्या साठ वर्षात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतावादी विचार राज्य आणि देशातही पोहोचविण्यासाठी माझे अखंड परिश्रम सुरू आहेत. राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे. कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले, त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे. साठ वर्षात जनतेकडून मिळणारे अखंड प्रेम, लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना झालेली विराट गर्दी आणि प्रचाराला मिळत असलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता हे सिद्ध होते.' असंही शाहू छत्रपती(Shahu Chhatrapati) यांनी म्हटलं आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, 'ज्या राजर्षी शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले. अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरु आहे, जे स्वत:ला राजर्षी शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात, याचे आपल्याला मनस्वी दु:ख होत आहे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com