Shambhuraj Desai : आता ठाकरेंनी रडीचा डाव बंद करून कोर्टात जावं; शंभुराज देसाईंचा सल्ला

Anil Parab : उगाच रोज उठायचे आणि रोज नवीन एक वक्तव्य करायचे
Shambhuraj Desai
Shambhuraj Desai
Published on
Updated on

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेना कोणाची, याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद चिघळला आहे. ते एकमेकांवर न्याय आणि अन्यायाची भाषा वापरून सडकून टीका करताना दिसत आहेत. ठाकरे गटाने नार्वेकरांनी दिलेला निकाल हा मान्य नसल्याचे म्हटले आहे. तर आता माजी मंत्री अनिल परबांनी निकालावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर शिवसेनाचे नेते, मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे. रडीचा डाव खेळण्यापेक्षा तुम्ही वरच्या कोर्टात जावा, असे सल्लाही त्यांनी दिला.

शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला देण्यात आली नसल्याने निकाल देताना नार्वेकरांनी 1999 च्या घटनेचा आधार घेतला आहे. तसेच ठाकरे गटाने सादर केलेली घटना चुकीची होती, असेही निकाल देताना नार्वेकरांनी स्पष्ट केले. यावर अनिल परबांनी, आमची घटना मिळाली नव्हती तर ती चूक कशी ठरवली. निवडणूक आयोगाला घटना आणि दुरुस्ती प्रस्ताव दिल्याची पोचपावती आमच्याकडे आहे, असा दावाही परबांनी केला. या दाव्यानंतर शंभूराज देसाईंनी ठाकरे गटाला सडेतोड प्रत्युत्तर दिले.

Shambhuraj Desai
Prakash Shendge : मनोज जरांगेंना प्रकाश शेंडगेंचा इशारा; म्हणाले, 'ओबीसी गाढवं, डुकरांसह...'

शंभूराज देसाई (Shamburaj Desai) म्हणाले, 'अनिल परब काय सांगतायत त्यापेक्षा घटनेने काय सांगितले ते पाहावे. यामध्ये विधिमंडळाने तुमच्या घटनेत काही बदल करायचे असतील. तर राष्ट्रीय कार्यकारणीची सर्वोच्च सभा घ्यावी लागते. रीतसर अजेंड्यावर विषय मांडावा लागतो, तो विषय बहुमताने मंजूर झाला. तर तशी सुधारणा पक्षाच्या घटनेत केल्यानंतर राज्य निवडणूक आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता घ्यावी लागते‌‌. घटनेत काही बदल करायचे असतील तर पक्षाच्या सचिवांना किंवा प्रमुखांना निवडणूक आयोग विचारतात. सद्यस्थितीत यातील कोणतीच प्रक्रिया राबवल्याचे आतातरी दिसत नाही. त्यामुळे कुठेतरी जाऊन पत्र दिलं दाखवायचं, असे बोलणे बंद करावे,' असा इशाराच त्यांनी दिला.

Shambhuraj Desai
Ajit Pawar : बारामतीवरून अजित पवारांचा काकांना खडा सवाल; म्हणाले, 'बारामतीचा विकास कुणी...'

'विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल दिला. या निकालावर तुम्ही समाधानी नसाल, तर वरच्या कोर्टात जा. उगाच रोज उठायचे आणि रोज नवीन एक वक्तव्य करायचे. काहीतरी नवीन कागद दाखवायचा. तुम्हाला कोर्टाची दारे उघडे आहेत. प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. योग्य पातळीवर योग्य सुनावणी होईल. साक्षी पुरावे बघितले जातील,' असे सांगत कोर्टात जाण्याचा सल्ला ठाकरे गटाला देसाईंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी होऊन, साक्षी-पुरावे पाहून, जाब-जबाब घेऊन तब्बल दोन तास निकाल पत्र वाचायला लागले. एवढे विस्तृत निकाल पत्र विधानसभा अध्यक्षांनी देऊनही आता ठाकरे गटाकडून रडीचा डाव खेळते. त्यापेक्षा त्यांनी वरच्या कोर्टात जावे. Anil Parab अनिल परबांनी बाहेर बोलण्यापेक्षा न्यायदेवतेवर विश्वास ठेवावा. आम्हांला न्यायदेवतेने न्याय दिला आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे,' असा टोलाही त्यांनी लागावला.

Shambhuraj Desai
Ajit Pawar : बारामतीवरून अजित पवारांचा काकांना खडा सवाल; म्हणाले, 'बारामतीचा विकास कुणी...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com