नेवासे ( जि. अहमदनगर ) : अहमदनगर जिल्हा दुष्काळी समजला जातो. शिवसेना ( Shivsena ) पक्ष बांधणी करण्यासाठी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) यांनी जिल्ह्याभर दौरे केले. यावेळी त्यांच्याकडे जिल्ह्यातील बंधारे जुने झाले असल्याने दुरुस्तीची मागणी होत होती. जिल्ह्यातील बंधारे माझ्या कार्यकाळात दुरुस्त करेल, असे आश्वासन त्यांनी नगर तालुक्यात आले असता दिले होते. या आश्वासनाची पुर्ती करण्यासाठीचे मोठे पाऊल आज मंत्री गडाख यांनी उचलले. यात सर्वाधिक बंधारे दुरुस्तीची कामे पारनेर तालुक्यात होणार आहेत. Shankarrao Gadakh gave Rs 52 crore for repair of dams in Nagar district
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 274 बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 52 कोटींचा निधी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील यांनी मंजूर केला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहेत. यापुढेही अहमदनगर जिल्ह्यातील राहिलेल्या बंधारे दुरुस्तीसाठी निधी मिळणार असल्याचे मंत्री गडाख यांनी सांगितले.
गेल्या एक-दीड वर्षांपासून मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेना शाखेचा प्रारंभ तसेच पक्ष वाढविण्यासाठी जिल्हा दौरा करत आहे. यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी त्यांनी बोलतांना बंधारे नादुरुस्त असल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे सांगत यासाठी त्यांनी अनेक ठिकणी सर्व्ह करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बंधारे दुरुस्त केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले होते त्याप्रमाणे दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय एकूण बंधारे व त्यासाठी मिळालेला निधी असा : नेवासे - 10 बंधारे 2 कोटी 13 लाख, कर्जत - 31 बंधाऱ्यासाठी 6 कोटी 12 लाख, कोपरगाव - 15 बंधारे 14 कोटी, जामखेड - 40 बंधारे 6 कोटी, नगर तालुका - 10 बंधारे 3 कोटी, पारनेर - 127 बंधारे 24 कोटी 53 लाख, राहाता - 17 बंधारे 2 कोटी 21 लाख, राहुरी - 9 बंधारे 1 कोटी, श्रीगोंदे - 25 बंधारे 7 कोटी 32 लाख, अकोले - 13 बंधारे 2 कोटी 58 लाख तसेच संगमनेर साठी यापूर्वी 4 कोटीचा निधी जलसंधारण खात्याने दिला आहे. पुढील टप्यात पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूरसह अन्य ठिकाणचे बंधारे दुरुस्त केले जाणार आहे .
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनांच्या मूळ आराखड्यात अहमदनगर जिल्ह्यातील 469 योजना समाविष्ट असून सदर योजनांमुळे 13 हजार 228 हेक्टर सिंचन क्षेत्र व 58 हजार 422.25 द.घ.मी. पाणी साठा पुनर्स्थापित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 386 योजनांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.