Solapur Lok Sabha Constituency : फडणवीसांचा उमेदवारीसंदर्भात फोन आला; बनसोडेंच्या दाव्याने सोलापूरच्या उमेदवारीचा तिढा वाढला

BJP candidate Issue : आता पुन्हा २०२४ मध्ये खुद्द फडणवीस यांनी विचारणा केल्याचा दावा शरद बनसोडे यांनी केल्याने सोलापूर उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. शरद बनसोडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात संघटन बांधले आहे.
Sharad Bansode
Sharad BansodeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 March : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सोडविण्यात भारतीय जनता पक्षाला अद्याप यश आलेले नाही. एकीकडे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचे नाव पक्के समजले जात असतानाच माजी खासदार शरद बनसोडे यांनी नवा दावा केला आहे. उमेदवारीसंदर्भात आपल्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, असे बनसोडे यांनी सांगितले आहे, त्यामुळे सोलापूर लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोण, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रविवारी सागर बंगल्यावर भाजप आमदारांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीतून सोलापूर लोकसभा ( Solapur Lok Sabha Constituency) उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोन लावला होता. सोलापूर लोकसभेसाठी आपण तयार आहात का, अशी विचारणा फडणवीस यांनी केल्याचा दावा माजी खासदार शरद बनसोडे (Sharad Bansode) यांनी केला. त्यामुळे बनसोडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Bansode
Mahajan Meet Mohite Patil : विजयदादांची नाराजी परवडणारी नाही; गिरीश महाजनांची अकलूजमध्ये जाहीर कबुली

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे आणि शरद बनसोडे यांची नावे चर्चेत होती. त्यातही फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे राम सातपुते यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बनसोडे यांच्या दाव्यामुळे सोलापूरच्या भाजप उमेदवारीची चर्चा पुन्हा रंगली आहे.

शरद बनसोडे यांनी 2014 मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. मात्र, 2019 मध्ये त्यांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्यामुळे ते नाराज होते. आता पुन्हा २०२४ मध्ये खुद्द फडणवीस यांनी विचारणा केल्याचा दावा शरद बनसोडे यांनी केल्याने सोलापूर उमेदवारीबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे. शरद बनसोडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात संघटन बांधले आहे.

Sharad Bansode
Solapur Loksabha Constituency : सोलापूरसाठी भाजपकडून राम सातपुतेंची उमेदवारी निश्चित; दोन आमदारांमध्ये होणार लढत

दरम्यान, काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे. त्या आक्रमकपणे प्रचार करताना भाजप आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत आहेत. मात्र, भाजपचा उमेदवार अजूनही ठरत नाही, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता दिसून येत आहे.

R

Sharad Bansode
Girish Mahajan On Akluj Tour : फडणवीसांचा निरोप घेऊन संकटमोचक महाजन मोहिते पाटलांच्या भेटीला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com