Subhash Deshmukh-Suresh Hasapure-Dharmaraj Kadadi-Dilip Mane
Subhash Deshmukh-Suresh Hasapure-Dharmaraj Kadadi-Dilip Manesarkarnama

South Solapur Constituency : भाजपच्या सुभाष देशमुखांना आव्हान कोणाचे...दिलीप माने, काडादी की हसापुरेंचे?

Assembly Election 2024 : महाविकास आघाडीकडून देशमुख यांच्या विरोधात धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने की जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
Published on

Solapur, 21 October : दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत सुभाष देशमुख यांनी अखेर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी पुन्हा एकदा मिळवली आहे. महायुतीकडून सुभाष देशमुख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना कोणाचे आव्हान असणार, याची सोलापुरात उत्सुकता आहे. महाविकास आघाडीकडून देशमुख यांच्या विरोधात धर्मराज काडादी, माजी आमदार दिलीप माने की जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची यादी पहिली यादी रविवारी (ता. 20 ऑक्टोबर) जाहीर केली. यात सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) तीन मतदारसंघांचा समावेश असून दक्षिण सोलापूर मतदार संघातून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

वास्तविक सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला त्यांच्या समर्थकांनी विरोध केला होता. विशेषतः उपमहापौर आणि माजी सभागृह नेते आणि सात माजी नगरसेवकांचा त्यामध्ये समावेश होता. त्या सर्वांचा विरोध मोडीत काढत सुभाष देशमुख यांनी विधानसभेचे उमेदवारी पुन्हा एकदा मिळविले आहे, त्यामुळे महायुतीकडून उमेदवारी निश्चित झाल्यामुळे देशमुख हे प्रचारालाही लागले आहेत.

महायुतीकडून सुभाष देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांना आवाहन कोण देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे जाईल, अशी चर्चा असून मागील काही निवडणुकांमध्ये तो काँग्रेसकडेच आहे, त्यामुळे या मतदारसंघातून देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Subhash Deshmukh-Suresh Hasapure-Dharmaraj Kadadi-Dilip Mane
Madha Politic's : तुतारीच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटलांशी जुळवून घेऊ; बबनराव शिंदेंची तहाची भाषा

महाविकास आघाडीकडून दक्षिण सोलापूरमधून माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ‌धर्मराज काडादी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्यासह स्थानिक नेते इच्छुक आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही दक्षिण सोलापूर मतदार संघावर दावा करण्यात आला असून या मतदारसंघातून शिवसेनेचे अमर पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीत दक्षिण सोलापूर मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो आणि सुभाष देशमुख यांना कोण आव्हान देणार, याची प्रतीक्षा सोलापूरमध्ये आहे.

Subhash Deshmukh-Suresh Hasapure-Dharmaraj Kadadi-Dilip Mane
BJP Election Strategy : भाजपने अचूक हेरले...महाराष्ट्रात धक्कातंत्र म्हणजे नसती उठाठेव!

महादेव कोगनुरेंनी पर्याय शोधला

सामाजिक कामांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर मतदारसंघात महादेव कोगनुरे यांना महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा होती. काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखतही दिली होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यासाठी झोकून देऊन काम केले होते. मात्र, महाविकास आघाडीतील इच्छुकांची भाऊगर्दी पाहून महादेव कोगनुरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. आता ते दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मनसेच्या रेल्वे इंजिनच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com