Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Sharad Pawar and Thopte family : मोठी राजकीय घडामोड! शरद पवारांनीही घेतली थोपटे कुटुंबीयांची भेट

Sharad Pawar Bhor Visit : सुनेत्रा पवार यांनी नुकतीच भोरमध्ये जाऊन काँग्रेस नेते थोपटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.
Published on

Bhor Political News : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. नुकतीच सुनेत्रा पवार यांनी भोरमध्ये जाऊन काँग्रेसचे नेते थोपटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याला सात दिवस उलटत नाही तोच शनिवारी शरद पवार यांनीसुद्धा भोरला जाऊन थोपटे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांंच्यासाठीच ही भेट असल्याचे सांगितले जात आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा अजित पवार अशी लढत होणार हे निश्चित आहे. सध्या सुनेत्रा पवार यांनी गाठीभेटीवर जोर दिला आहे. तर सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघात संपर्क मोहीम सुरू केली आहे. या नणंद, भावजयी यांच्यातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News
Madan Bafna Vs Sunil Shelke : 'आमदार शेळकेंनी अनेकांना दमबाजी केली, पण...' ; मदन बाफनांचा मोठा दावा!

मागील आठवड्यात सुनेत्रा पवार यांनी मतदारसंघात भेटीगाठीवर भर दिला आहे. त्यांनी या दौऱ्यात थोपटे कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तसेच अनंतराव थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. याशिवाय संग्राम थोपटे, पृथ्वीराज थोपटे यांच्याशी चर्चा केली होती.

खासदार शरद पवारांच्या(Sharad Pawar) कट्टर विरोधकांच्या या भेटीमुळे चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच थोपटे कुटुंबीयांची सुनेत्रा पवार यांना साथ मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. आता या भेटीला सात दिवस उलटत नाहीत तोच शरद पवार यांनी शनिवारी भोर दौऱ्यावर असताना माजी आमदार अनंतराव थोपटे यांची व त्यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

Sharad Pawar News
Lok Sabha Election 2024 : चाणक्य शाहांनी शिंदे-पवारांचे विमान जमिनीवर आणलं; उमेदवार महायुतीचा चिन्ह कमळचं?

या वेळी त्यांनी अनंतराव थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच संग्राम थोपटे, पृथ्वीराज थोपटे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेमुळे थोपटे कुटुंबीयांची साथ कोणाला सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) की सुप्रिया पवार यांना याची उत्सुकता आता लागली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com