Ahmednagar Politics : पवारांच्या निष्ठावंत आमदाराच्या फेसबुक पोस्टने खळबळ; व्हायरल झाल्यानंतर केली डिलीट

Prajakt Tanpure Facebook Post Viral : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदाराची फेसबुक पोस्ट व्हायरल...
Sharad Pawar, Prajakt Tanpure
Sharad Pawar, Prajakt TanpureSarkarnama
Published on
Updated on

Prajakt Tanpure ED Cases :

माफी असावी.. थांबतो आता... अशी फेसबुक पोस्ट माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नावाने असलेल्या एका फेसबुक अकाउंटवरून व्हायरल झाली. या पोस्टच्या आधारे एका वृत्तपत्रात वृत्तही प्रसिद्ध झाले. पोस्ट वेगाने व्हायरल झाल्यानंतर संबंधित फेसबुक खात्यावरून अल्पावधीतच डिलीटही करण्यात आली. पण व्हायरल झालेल्या पोस्टमुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

या पोस्टवर आमदार तनपुरे यांच्याशी दिवसभर संपर्क होत नसल्याने आणखीनच सस्पेन्स वाढला. अखेर आमदार तनपुरे यांनी "सरकारनामा"शी संपर्क साधून पोस्ट ज्या फेसबुक खात्यावरून व्हायरल झालेली आहे ते खाते मी वापरत नाही, अशी माहिती दिली. राजीनामा देण्याचा किंवा थांबण्याचा असा काहीही विषय नाही, असेही आमदार तनपुरे यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री आमदार Prajakt Tanpure म्हणाले, "आपण न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबईत होतो. "ईडी"च्या प्रकरणात आपल्याला जामीन मिळाला आहे. माफी असावी... थांबतो आता... ते अधिकृत फेसबुक अकांउट नाही".

Sharad Pawar, Prajakt Tanpure
Ahmednagar Politics : विखेंच्या दक्षिणच्या साखरगोडव्यात राणी लंकेंकडून मिठाचा खडा!

आमदार तनपुरेंच्या नावाने व्हायरल झालेली पोस्ट आहे तरी काय?

माफ करा ..थांबतो आता...

आपण सर्वांनी मला राजकीय जीवनात खूप साथ दिली धन्यवाद. माफी असावी थांबतो आता. या दोन वाक्याच्या पोस्ट प्राजक्त तनपुरे यांच्या फेसबुक अकाउंटवर आज सकाळी दहा वाजता शेअर झाली. नंतर ती डिलिट झाली.

सायंकाळच्या दैनिकात याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले. सायं दैनिकात आज सकाळी दहा वाजता असे म्हटलेले होते. त्यात उद्या ईडीची तारीख आहे, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात मुंबईत त्यांना आज शुक्रवारी बारा जानेवारीला तारीख होती. त्यामुळे ती पोस्ट कदाचित काल रात्री दहा वाजता शेअर केल्याची शक्यता अधिक वाटते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईडी तारखेचा उल्लेख करत मी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही, काही चुकले असेल तर माफ करा. उद्या ईडीची तारीख आहे. त्याबाबतीत मी मोडेल पण वाकणार नाही. पण इतर काही वैयक्तिक बाबी आहेत. त्यामुळे मी पदाला न्याय देऊ शकत नाही. माफी असावी. थांबतो आता.. अशी पोस्ट शेअर करत त्यांनी सर्वांना हात जोडले आहेत.

त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही वेळाने ती डिलीट करण्यात आल्याचे लक्षात आले. पण याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते थेट संध्याकाळीच उपलब्ध झाले. त्यानंतर हे सर्व चित्र स्पष्ट झाले. शेअर पोस्टने राजकीय निरीक्षकांचे अंदाज बुचकळ्यात पडले.

आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्या सोबत आहोत. राहणार आहोत, असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. मध्यंतरी डिसेंबर महिन्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे परत राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यातच या फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

edited by sachin fulpagare

Sharad Pawar, Prajakt Tanpure
Radhkrishna Vikhe : मंत्री विखेंकडून निमंत्रण; महायुती मेळाव्याला आमदार लंके येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com