Sharad Pawar NCP : शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभेची रणनीती ठरली; जिल्ह्यात ‘या’ पाच जागा लढवणार

Assembly Election Strategy : विधानसभा निवडणुकीत मोजक्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून निवडणुका जिंकण्याचा निर्धार पक्षाने केल्याचे दिसून येत आहे. पक्षाची शिवस्वराज यात्रा ज्या मतदार संघात जात आहे, त्यातून राष्ट्रवादीचे सूत्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
Sharad Pawar NCP
Sharad Pawar NCPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 15 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज यात्रा नुकतीच सोलापूर जिल्ह्यात येऊन गेली. ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात न फिरता मोजक्याच पाच विधानसभा मतदारसंघातून फिरली आहे, त्यामुळे शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही ‘विनिंग स्ट्राईक रेट’ राखण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसून येत आहे.

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar NCP) ही महाविकास आघाडीत आहे आणि महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीबाबतचे जागा वाटप अजूनही झालेले नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेच्या (Shivswaraj Yatra) माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

काँग्रेसने विभागीय बैठकीच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. एकंदरीतच विधानसभा जागा वाटपासंदर्भात सूत्र निश्चित नसताना या दोन्ही काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीती आखण्यास वेग दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्या आहेत, त्या प्रमाणाचे विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मोजक्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून निवडणुका जिंकण्याचा निर्धार पक्षाने केल्याचे दिसून येत आहे. पक्षाची शिवस्वराज यात्रा ज्या मतदार संघात जात आहे, त्यातून राष्ट्रवादीचे सूत्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पाच विधान मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज यात्रा फिरली. यात माळशिरस, मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, माढा आणि करमाळा या मतदारसंघांचा समावेश आहे, या पाचपैकी दोन मतदारसंघ वगळता शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावेही निश्चित झाली आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाने लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होते.

Sharad Pawar NCP
Ajit Pawar : अजितदादा बारामती विधानसभेच्या रिंगणात असतील का?; सुनील तटकरेंनी सगळंच सांगून टाकले...

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून माजी महापौर महेश कोठे हे इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित मानले जात आहे. मोहोळमध्ये भाजपमधून आलेले संजय क्षीरसागर यांचा उमेदवारीवर दावा आहे, मात्र पक्षाकडून येथील उमेदवारीबाबत खल सुरू आहे. माढ्यात शरद पवार गटाकडून सर्वाधिक इच्छूक आहेत. संजय कोकाटे हे पक्षात असून त्यांनी तयारी चालवली आहे. बबनराव शिंदे आणि त्यांच्या मुलानेही पवारांची भेट घेतली आहे. याशिवाय बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.

तसेच विठ्ठल सहकारी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचे नाव चर्चेत आहे. शिवस्वराज्य यात्रेत खासदार अमोल कोल्हे यांनी माढ्याचा उमेदवार हे शरद पवार आहेत असे समजून कामाला लागा, असे आवाहन केले आहे, माढ्याची उमेदवार नेमकी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.

करमाळ्यातून विधानसभेची उमेदवारी ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठरल्याची दिसून येत आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीबाबत त्याचवेळी ठरल्याची चर्चा आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांनी नारायण पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत, त्यामुळे करमाळ्यातून नारायण पाटील हे उमेदवार निश्चित मानले जातात.

Sharad Pawar NCP
CM Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजना ही तर पॉलिटिकल स्टंटबाजी; निवडणुकीनंतर ती सावत्र होणार ’

लोकसभेला मोहिते पाटलांना मदत, तर विधानसभेला उत्तम जानकर यांना उमेदवारी या सूत्रानुसार माळशिरसमधून उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानसभेचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, त्याच मतदारसंघातून शिवस्वराज यात्रा फिरत आहे, त्यामुळे ही यात्रा फिरत असलेले मतदारसंघ शरद पवार गटाला सुटणार असे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com