Sharad Pawar News : कोल्हापूर तापलं ! पवारांच्या सभेची बॅनरबाजी अन् मुश्रीफांना टोलेबाजी ; खोपडेंची गद्दारी...

Kolhapur Politics : येवला, बीडनंतर आता मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोल्हापूरमध्ये 25 ऑगस्टला शरद पवारांची तोफ धडाडणार....
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Nirdhar Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आणि त्यांच्या प्रेमानं एकेकाळी अश्रू ढाळणारे मंत्री हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गटात सामील झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता खुद्द शरद पवार मैदानात उतरले असून बंडखोरांच्या मतदारसंघात सभांचा धडाका लावत त्यांनी तगडं आव्हान उभं करण्याचा चंग बांधला आहे.

याचाच भाग म्हणून येवला, बीडनंतर आता मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोल्हापूरमध्ये येत्या 25 ऑगस्टला शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. या सभेअगोदर आता कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असतानाच कोल्हापुरात एका वेगळ्याच फलकाची चर्चा रंगली आहे.

Sharad Pawar
Hasan Mushrif On Sharad Pawar : शरद पवार तुमच्या सोबत कधी येणार; मुश्रीफ म्हणाले...

खासदार शरद पवार यांची २५ ऑगस्टला ऐतिहासिक दसरा चौक येथे जाहीर सभा होणार आहे. यानिमित्त या गटाचे शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सुरु झाली आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असतील. या सभेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या फुटीनंतर पवार कोल्हापुरात येत आहेत. व्ही. बी. पाटील यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar
Kshirsagar On Munde : आधी कोपरखळ्या अन् आता पायघड्या; डॉ.क्षीरसागरांकडून मुंडेंचं तोंडभरून कौतुक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांची सभा 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील दसरा चौक येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एका वेगळ्याच फलकाची चर्चा रंगली आहे. छत्रपती शिवरायांनी ज्यांच्यावर मर्जी दाखवली त्यांनीच गद्दारी केली. या संदर्भाचा दाखला देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची बॅनरबाजी केली आहे.

काय आहे बॅनर...?

"महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास फर्मानासमोर गुडघे टेकणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजींचा आदर्श सांगतो." अशा आशयाचा फलक दसरा चौक येथे लावला आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे झुकणार नाही. हा निर्धार करण्यासाठी दसरा चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

Sharad Pawar
Eknath Shinde On Chandrayaan-3 Landing : चांद्रयान- ३ मोहीम फत्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

काय सांगतो, खंडोजी खोपडे आणि कान्होजी जेधेंचा इतिहास ?

उत्रावळीची देशमुखी असलेल्या खंडोजी खोपडेचा केदार खोपडे हा भाऊ. या देशमुखीवरून दोन्ही भावंडांत वाद झाले. त्या वादात महाराजांनी मध्यस्ती करून खंडोजीला देशमुखी मिळवून दिली होती. मात्र अफझलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी खंडोजी खोपडे महाराजांच्या विरोधात गेला. तर, अफजलखान स्वराज्यावर चालून आला.

त्यावेळी महाराजांनी कान्होजींना बारा मावळातील देशमुख आणि त्यांच्या फौजा अफजलखानाविरुद्ध स्वराज्यासाठी एकत्र करून त्याविरोधात उभा करण्याची महत्त्वाची जबाबदारी दिली. ती कामगिरी कान्होजींनी अतिशय समर्थपणे बजावली. महाराजांनी अफजलखान फाडला, तेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या त्याच्या सैन्यावर जो अभूतपूर्व छापा मराठ्यांनी घातला, त्याचं नेतृत्व कान्होजींकडे होतं. या पराक्रमासाठी महाराजांनी जेध्यांना दरबारातील पहिल्या तलवारीचा मान दिला होता.

(Edited By Deepak Kulkarni )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com