Hasan Mushrif On Sharad Pawar : शरद पवार तुमच्या सोबत कधी येणार; मुश्रीफ म्हणाले...

Hasan Mushrif On Ncp Crisis : याबाबत तुम्ही त्यांनाच विचारू शकता
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांची पुण्यात झालेल्या गुप्त भेटीने राजकारण चांगेलच ढवळून निघाले. आता त्यांच्या याच भेटीवरून राजकारणात नव्या चर्चांना ऊत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना यांना, आगामी काळात जर शरद पवारांना भाजप सोबत घेऊन आले, तरच मुख्यमंत्रीपद देणार असल्याची अट घातली असल्याचा दावा, राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावर आता राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar News
Vijay Wadettiwar News : शरद पवारांना भाजपसोबत आणण्याच्या मोदींच्या अटीचा दावा वडेट्टीवारांनी का केला ?

वडेट्टीवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अजित पवारांना अट घातली आहे की, शरद पवार (Sharad Pawar) भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री होता येईल. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने बाळगू नका, ते काही पूर्ण होणार नाही, अशी ही माहिती समोर येत आहे." असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.

विजय वडेट्टीवारांनी हा दावा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. याच वक्तव्याच्या संदर्भात पत्रकारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, "याबाबत तुम्ही वडेट्टीवार यांनाच विचारू शकता." पुढे पत्रकारांनी विचारले की, तुमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तुमच्यासोबत येतील का?

Sharad Pawar News
Maharashtra Politics: काँग्रेस फुटणार; सर्वपक्षीयांचे सरकार येणार ? नारायण राणेंचा नवा बॉम्ब

शरद पवार सोबत येतील का? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले,"साहेबांना सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न सुरूच आहेत. आम्ही त्यांना भेटूनही आलो आहोत. साहेबांनी सोबत यांव यासाठी साकडेही घातले आहे. त्यांनी सोबत यावं अशी आमची इच्छा आहे. आमचा परिवार एकच आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे. महाराष्ट्राचा विकास घडवून आणण्यासाठी आम्ही भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com