Sharad Pawar : कोल्हापुरातून शरद पवारांनी ठोकला शड्डू; 'स्थानिक'च्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या शिलेदारांना दिल्या सूचना

Sharad Pawar NCP strategy : लोकसभा निवडणुकीत यश मिळवलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत अपयश पचवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 25 Apr : लोकसभा निवडणुकीत यश मिळवलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत अपयश पचवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. गुरुवारी राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार कोल्हापूर विमानतळावर आल्यानंतर कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील काही मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी भेट घेऊन काही विषयांवर चर्चा केली. या चर्चे दरम्यान पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत.

आगामी स्थानिकच्या निवडणुका दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीला सज्ज राहून कामाला लागावे, अशा सूचना पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Sharad Pawar
Uddhav Thackeray MPs absence : सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या खासदारांची दांडी! गैरहजेरीचे खरे कारण आले समोर

शरद पवार हे दोन दिवसांसाठी कोकण दौऱ्यावर आहेत. गुरूवारी ते कोल्हापूर विमानतळावर काही काळासाठी दाखल झाले. पवार आणि प्रतिभा पवार यांची जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट घेत चर्चा केली. विमानतळाच्या व्हीआयपी कक्षामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची जिल्ह्यातील स्थिती, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची संघटन बांधणी सर्व संबंधिताची माहिती पवार यांनी घेतली. आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे सर्वाधिकार त्या-त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून संबंधित जिल्हाध्यक्षांनाच देण्याचे धोरण ठरविण्याचा पक्षाचा विचार सुरू असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
BJP Minister offer : भाजप मंत्र्याची ठाकरेंच्या आमदाराला खुली ऑफर; म्हणाले, 'सोबत या...'

या निवडणुकांसाठी प्रदेशकडून पाठबळ दिले जाईल. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नाराज होऊ नका, कामाला लागा. तालुकापातळीवर दौरे करून पक्ष संघटन वाढावा. कार्यकर्त्यांशी संवाद साधा’, असे पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. या चर्चेनंतर ते हेलिकॉप्टरने वेंगुर्ल्याकडे रवाना झाले.

दरम्यान, जाता जाता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीची देखील परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील इंडिया आघाडी एकत्रपणे काम करते का? हे देखील जाणून घेतले. त्यावर जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे काम सुरू असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com