Police recruitment News : पोलीस होण्याचे स्वप्न भंगले ; धावण्याचा सराव करणाऱ्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू

Karad Accident News : समोरून आलेल्या टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक बसली.
Police recruitment News
Police recruitment News Sarkarnama
Published on
Updated on

Karad : पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना कोयनानगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली.

चारचाकी आणि दुचाकीची धडक झाल्याने यात दुचाकीवरील दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारे दोन्ही युवक अपघातात ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Police recruitment News
PM Modi News : २३ ऑगस्ट यापुढे ‘नॅशनल स्पेस डे’: मोदींची घोषणा ; म्हणाले, "मेक इन इंडियाला तुम्ही चंद्रावर पोहोचवलं.."

या अपघाताची नोंद रात्री उशिरा कोयनानगर पोलीस ठाण्यात झाली आहे. कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दाखल केले.

कोयना विभागातील तोरणे येथील प्रसाद आनंदा कदम (वय 23) आणि प्रणय उत्तम कांबळे (वय 22, कोयनानगर, हुंबरळी), धीरज संतोष बनसोडे (वय 18, मूळ रा.नाशिक, सध्या रा. कोयनानगर) असे तिघे दुचाकीवरून निघाले होते. गोषटवाडी गावाजवळ वळणावर समोरून आलेल्या टेम्पोची आणि दुचाकीची जोरदार धडक बसली.

Police recruitment News
Chandrayaan-3 : 'चांद्रयान' लॅण्ड झालेल्या जागेचे पंतप्रधान मोदींनी केले नामकरण ; "तुमचं कितीही कौतुक केलं तरी कमीच"

यात तिघेही रस्त्यावर कोसळले. या अपघातात दुचाकीवरील धीरज हा युवक जागीच ठार झाला. तर प्रणय उत्तम कांबळे याला उपचारासाठी गाडीतून नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकी चालक प्रसाद कदम हा जखमी झाला आहे. त्याच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com