Sharad Pawar News : पक्ष म्हणजे आमदार नव्हेत.. ; राष्ट्रवादीत फूट नसल्याचा शरद पवारांचा पुनरुच्चार ; मी राष्ट्रीय अध्यक्ष..

NCP News : मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत.
Sharad Pawar Speech
Sharad Pawar Speech Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचा पुनरुच्चार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी कोल्हापुरात केला. "आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तूस्थिती आहे. पक्ष म्हणजे आमदार नव्हेत, देशपातळीवरील संघटनेत फूट नाही, काही आमदार पक्षातून बाहेर गेल्याने पक्षात फूट पडत नाही. मी राष्ट्रीय अध्यक्ष असून जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत," असे सांगत पक्षात फूट नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले "सत्तेचा गैरवापर होत असल्याने संघर्ष करावा लागेल. तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे. भाजपने कर्नाटकात सत्तेचा गैरवापर करुन पाहिला. तुमचा विचार सोडा आणि आमच्याकडे या, नाहीतर तुरुंगात जा, अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक, ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांच्यावर अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली. सत्तेच्या गैरवापर करुन विरोधकांना नामोहरम कसे करता येईल , यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे,"

Sharad Pawar Speech
Police recruitment News : पोलीस होण्याचे स्वप्न भंगले ; धावण्याचा सराव करणाऱ्या दोन युवकांचा अपघाती मृत्यू

"सत्ताधाऱ्यांनी निवडणुका नको आहेत. निवडणुका घेतल्या की सत्ताधाऱ्यांनी जनमत काय आहे ते कळेल. लोकसभा निवडणूक एकत्रपणे लढणे शक्य आहे का ? यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी व लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्यासाठी 'इंडिया'ची बैठक एक सप्टेंबरला मुंबईत होत आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना ते सामुदायिकपणे, एकत्रितपणे कसे जाता येईल? यासंबंधीच्या शक्यता पडताळून पाहिल्या जातील," असे पवार म्हणाले.

Sharad Pawar Speech
PM Modi News : २३ ऑगस्ट यापुढे ‘नॅशनल स्पेस डे’: मोदींची घोषणा ; म्हणाले, "मेक इन इंडियाला तुम्ही चंद्रावर पोहोचवलं.."

"इंडिया आघाडीच्या बैठकीला देशातील 16 प्रमुख राजकीय पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादीकडून मी, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राजस्थान, झारखंड, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बैठकीला येणार आहेत," असे पवारांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com