Pawar-Shinde News : मुख्यमंत्रिपदाबाबत पवारांची सुशीलकुमार शिंदेंना गुगली : ‘तुमचं काय सांगता येत नाही...’

Sushilkumar Shinde News: त्यांचा एक स्वभाव होता की जेवण झाल्यावर त्यांना झोप काय आवरायची नाही.
Sharad Pawar-Sushil Kumar Shinde
Sharad Pawar-Sushil Kumar ShindeSarkarnama

Sangli News : सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) होते. मला वाटतं एकदा, दोनदा...? कितादा...? (व्यासपीठाकडे पाहत शरद पवारांचा Sharad Pawar प्रश्न, तिकडून एकदा असे उत्तर आले) एकदाच.. (तेवढ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तीनवेळा होते, असेही कुणीतरी म्हटले.

आता होण्याची इच्छा नाही, असे कोणीतरी कमेंट केली) त्यावर पवारांनी ‘आता होण्याची इच्छा नाही,’ अशी गुगली टाकली. पण, लगेच ‘तुमचं काय सांगता येत नाही,’ असेही पवार म्हणाले. (Sharad Pawar's comment on Sushilkumar Shinde regarding the post of Chief Minister)

गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ सांगलीत विविध मान्यवरांच्या उपस्थित झाला. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्य सहकारी बॅंकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, शरद पाटील यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. त्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

Sharad Pawar-Sushil Kumar Shinde
Uddhav Thackeray News: निवडणूक आयोगावर केस केली जाईल : उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

पवार म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी संभाळली. देशाचे गृहमंत्री झाले. पुण्याच्या महाविद्यालयात शिकणारा तरुण कार्यकर्ता म्हणून आमच्या सोबत ते कायम असत. त्यांच्यात कर्तृत्व आहे.

पण, महाराष्ट्राची नीट माहिती नाही; म्हणून कर्तृत्व असलेल्या माणसाला महाराष्ट्राची माहिती नीट झाली, तर महाराष्ट्राचे हित सांभाळण्याची दृष्टी आणि ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहित करण्याचे ठरविले.

Sharad Pawar-Sushil Kumar Shinde
Thackeray On Election Commission : ठाकरेंची मोठी मागणी : निवडणूक आयोग बरखास्त करा

महाराष्ट्राचे चित्र शिंदे यांना नीट समजावे; म्हणून त्या काळात मी एक उद्योग करायचो. मी महाराष्ट्रात कुठेही दौऱ्यावर निघालो की, सुशीलकुमार शिंदेंना माझ्या गाडीत घालायचो. कार्यक्रम संपला, चांगल्या प्रकारचं जेवण झालं की, आमचा पुढच्या गावातील कार्यक्रम असायचा.

प्रवासादरम्यान आमची चर्चा असायाची, या गावात आपण हे पाहिलं. पण, त्यांचा एक स्वभाव होता की जेवण झाल्यावर त्यांना झोप काय आवरायची नाही. त्यामुळे माझ्या प्रश्नोत्तराच्या वेळेला मला अनेकदा त्यांना उठवावं लागायचं, असाही किस्सा पवारांनी सांगितला.

Sharad Pawar-Sushil Kumar Shinde
ShivSena News : ...तर शिवसेनेसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो; कायदेतज्ज्ञांचे भाकीत

पवार म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांना महाराष्ट्राच्या विधीमंडळात पाठविण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यानंतर ते आयुष्यात पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिले. तोपर्यंत त्यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली नव्हती.

काहीही माहिती नव्हती. पण सोलापुरातील करमाळ्यातून ते मोठ्या मतांनी निवडून आले आणि फार थोड्याच दिवसांत वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्यावर काही जबाबदारी टाकण्यात आली.

त्यानंतर या गृहस्थाने सार्वजनिक जीवनात जे काही पाऊल टाकलं ते कधीही मागं घेतलं नाही. ते देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत पोचले आणि आपल्या कर्तृत्वाची प्रचिती महाराष्ट्राला आणि देशाला दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com