Uddhav Thackeray News: निवडणूक आयोगावर केस केली जाईल : उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

निवडणूक आयोग म्हणजे काय सुलतान नाही आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai News : पक्षनिधीबाबत ठरविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला (Election Commission) नाही. तसं झालं तर निवडणूक आयोगावर केस केली जाईल. आयोगावर खटला भरला जाईल.

कारण कोणाच्या निधीवर दरोडा टाकण्याचा अधिकार आयोगाला नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षनिधीवरून सुरू असलेल्या चर्चेवर इशारा दिला. (A case will be filed against the Election Commission : Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray
ShivSena News : ...तर शिवसेनेसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द होऊ शकतो; कायदेतज्ज्ञांचे भाकीत

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला फक्त पक्षाचे नाव आणि निवडणुकीसाठीचे चिन्ह ठरविण्याचा अधिकार आहे. त्याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाला इतर अधिकार नाहीत.

देशात निवडणुका घेणे, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही, हे बघण्याचा अधिकार त्यांना आहे. पण निवडणूक आयोग म्हणजे काय सुलतान नाही आहे.

Uddhav Thackeray
Thackeray On Election Commission : ठाकरेंची मोठी मागणी : निवडणूक आयोग बरखास्त करा

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला होता. त्यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे.

त्याचबरोबर नीतिशकुमारांचाही फोन आला होता. मात्र, चुकामूक झाल्यामुळे त्यांच्याशी माझे बोलणे होऊ शकलेले नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत करत आहे, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

Uddhav Thackeray
Nanded Politics : भाजप खासदाराची आमदाराच्या पत्नीने भरसभेत लाज काढली

ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निकालाचे प्रकरण हे देशभर पेटेल. आज एका पक्षावर पाळी आणल्यावर उद्या बाकीचे पक्षही ते संपवतील की काय अशी भीती नागरिकांच्या मनात आहे.

देशातील लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ती लोकशाही इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर फक्त ७५ वर्षेच शिल्लक राहिली होती काय, असा प्रश्न आपल्याला भावी काळ विचारेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com