Sharad Pawar News : शरद पवारांचा पंढरपुरात मेळावा‌; माढा-सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा

NCP : पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन, शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महत्त्वाच्या शहरात जंगी सभा घेतल्या. आता आगामी लोकसभा निवडणुका पाहता शरद पवार हे स्वत: मतदारसंघाची चाचपणी करत आढावा घेत आहेत. या अनुषंगानेच पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आता सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात कार्यकर्त्यांचा मेळावा‌ होणार आहे.

या मेळाव्याची मोठी तयारी करण्यात आली असून, पंढरपूर शहरात वातावरण निर्मिती करण्यासाठी शरद पवारांच्या स्वागताचे ठिकठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सभागृहात सोमवारी दुपारी 2 वाजता शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे.

Sharad Pawar
Ahmednagar Politics: सुजय विखेंची डोकेदुखी वाढली ? अजितदादांच्या गटाची नगर दक्षिणच्या जागेसाठी चाचपणी

मात्र, याआधी माढा तालुक्यातील कापशी येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून शरद पवार हे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांतील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.

सध्या सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी दोन्ही मतदारसंघांत दौरे वाढवले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, माळशिरसचे उत्तम जानकर, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, असे अनेक मातब्बर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार कोणता नवा डाव टाकतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar
MP Omprakash Raje Nimbalkar News : तुळजाभवानीच्या दर्शनाची ओढ, खासदार ओमराजे २१ किलोमीटर धावले..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com