NCP-SP : आगामी 'स्थानिक'साठी रणनीती ठरली? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिकेसाठी चाचपणी सुरू

Sharad Pawar Sangli Election Planning: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढता दिसत आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसह संघटनबांधणी मजबूत करण्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी तयारीला लागली आहे.

स्थानिक नेत्यांसह माजी आमदारांना पक्षात घेऊन ताकद वाढवली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सांगलीत राजकीय अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. अशावेळी आगामी 'स्थानिक'साठी रणनीती आखण्याचे काम पक्षाने सुरू केले आहे. तर लवकरच प्रभागनिहाय बैठका आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. तर जे दुर्लक्षीत असणारे माजी आमदार, पदाधिकारी आता सत्ताधारी पक्षांच्या वाट धरत आहेत. होमग्राउंडवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अजित पवार यांनी आव्हान उभे केलं होतं.

त्यांनी जयंत पाटील यांना धक्का देत माजी आमदार शिवाजीराव नाईक यांना पक्षात प्रवेश देण्याचे ठरवले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार गटाचं नेमकं काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता.

पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सांगली शहर-जिल्हा कार्यकारिणी तसेच प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेल तसेच संघटनांच्या शहर-जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी घेत सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. त्यांनी यावेळी सांगली, मिरज व कुपवाड तिन्ही शहरांचा आढावा घेतला आहे.

तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी संघटनबांधणी मजबूत करण्यासाठी बैठकीत सर्व बाबींवर चर्चा करताना महत्वाचे आदेशही दिले आहेत.

Sharad Pawar
Ajit Pawar on Sharad Pawar : पवारसाहेबांनी विकास कामं करण्याचा प्रयत्न केला; बारामतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य

बजाज यांनी सर्व शहर-जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना आपापल्या प्रभागात संघटनबांधणीवर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर लवकरच प्रभागनिहाय बैठका आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली जाणार असल्याते स्पष्ट करण्यात आले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar and ajit pawar News : साताऱ्यात मोठी राजकीय घडामोड! शरद पवार अन् अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक; नेमके कारण आले समोर

यावेळी महिला शहर-जिल्हाध्यक्षा संगीता हारगे, सचिन जगदाळे, सागर घोडके, अभिजित हारगे, धनपाल खोत, तानाजी गडदे, हरिदास पाटील, उत्तम कांबळे, समीर कुपवाडे, ज्योती अदाटे, महालिंग हेगडे, युवराज गायकवाड, चंद्रकांत हुलवान, अर्जुन कांबळे, विनायक हेगडे, शीतल खाडे, फिरोज मुल्ला, संगीता जाधव, अमृता चोपडे, विनायक हेगडे, अभिजित रांजणे आदी पदाधिकारी उपस्थित होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com