Ajit Pawar on Sharad Pawar : पवारसाहेबांनी विकास कामं करण्याचा प्रयत्न केला; बारामतीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य

NCP President DCM Ajit Pawar Sharad Pawar development Pune and Baramati Maharashtra : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांनी विकास कामं करण्याचा प्रयत्न केल्याचे विधान केलं आहे.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics 2025 : काही दिवसापूर्वी बारामती दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना माझ्यासारखा काम करणारा आमदार बारामतीला मिळणार नाही, असं वक्तव्य केलं होतं.

1952पासून बारामतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांच्या कारकिर्दीतील कामगिरी पाहिल्यानंतर हे तुम्हाला समजेल, असे देखील म्हणाले होते. यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार हे बारामती दौरावर असताना त्यांनी शरद पवार साहेबांनी देखील आपल्या परीने विकास काम करण्याचा प्रयत्न केला, असं वक्तव्य केलं आहे.

आठवडाभरापूर्वी बारामतीमध्ये एका कार्यक्रमांमध्ये बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी माझ्यासारखा काम करणारा आमदार बारामतीला मिळणार नाही, असा माझा दावा असल्याचे त्यांनी सांगितले होते. 1952ला पहिली निवडणूक झाली तेव्हापासून बारामतीचे प्रतिनिधित्व करणारे आमदारांची कारकीर्द पहा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय काय काम केले याचा आढावा घ्या. आणि तुम्ही मला 1991 पासून आमदार केल्यानंतर मी काय काम केले ते पाहा. मी आता माझ्या कामात थांबवणार नाही, तुम्ही मला यंदा लाखांनी निवडून दिला आहे.त्यामुळे आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक टर्ममध्ये मी जेवढं काम केलं नसेल तेवढं जास्त काम यंदाच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये करून दाखवणार आहे.

Sharad Pawar Ajit Pawar
Ajit Pawar Visit Suraj Chavan House : अजितदादा शब्दाचा पक्का! थेट पोहोचले झापुक झुपुकच्या घरी; म्हणाले, 'लोकांना माहितीये मी...'

माझ्याकडे अनुभव आहे. कोणत्याही कामासाठी बजेटमध्ये कशा पद्धतीने तरतूद करायची याची माझ्याकडे माहिती आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून कशाप्रकारे निधी आणायचा त्याची देखील मला माहिती असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं. अजित पवार यांनी या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली असल्याचं बोललं जात होत. अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या या वक्तव्यानंतर आज केलेल्या वक्तव्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे.

Sharad Pawar Ajit Pawar
Lok Sabha reforms : 550 संख्येपेक्षा जास्त सदस्य असलेली संसद खरोखर हवी आहे का?

टीसीएस फाऊंडेशनच्या सीएसआर निधीतून जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उजवा कालवा रायझिंग ते बोरकरवाडी तलावपर्यंत करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज अजित पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थितांशी अजित पवार यांनी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, "बारामतीमध्ये मी अनेक वर्ष काम करत आहे. तुम्ही मला आठव्यांदा निवडून दिला आहे. मी माझ्या परीने विकास काम करण्याचा प्रयत्न करत असतो यामागे राज्याच, जिल्ह्याचं भलं व्हावं ही भावना असते. अनेकांनी अनेक वर्ष त्यांच्या परीने विकास काम करण्याचा प्रयत्न केला आहे".

शरद पवार साहेबांनी आपल्या परीने विकास काम करण्याचा प्रयत्न केला. तसंच मी देखील आपल्या परीने विकास काम करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक वडीलधाऱ्यांनी देखील आपापल्या काळामध्ये विकास काम करण्याचा प्रयत्न केला. चांगुरे आबा, पानसरे काका यांसारख्या खूप जणांची नावे घेता येतील त्यांनी आपापल्या काळात विकास काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com