Maan NCP News : शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला; म्हणाले, मी कांदा उत्पादकांवर कधीच कर बसवला नाही...

Sharad Pawar दहिवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवार बोलत होते.
Eknath Shinde, Sharad Pawar
Eknath Shinde, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

-रूपेश कदम

Maan Sharad Pawar News : कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी मी दहा वर्षे कृषीमंत्री होतो. पण आम्ही कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही, त्यांचा माल जगात कोठेही विकण्यासाठी थांबवला नाही, असे प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार Sharad Pawar यांची आज काेल्हापूर येथे सभा हाेणार आहे. त्यापूर्वी त्यांचा दहिवडी येथे कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या Central Government कारभाराविषयी टीका केली. पवार म्हणाले मणिपूर आणि अन्य राज्यात गंभीर घटना घडत आहेत. परंतु केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात कर बसवला आहे. यावरून सध्या वातावरण पेटले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेवर शरद पवार म्हणाले, मी दहा वर्षे केंद्रात कृषीमंत्री होतो. आम्ही कधीच कांदा उत्पादकांवर कर बसवला नाही. त्यांचा माल जगात कोठेही विकण्यासाठी थांबवला नाही.

त्यावेळी सभागृहात प्रश्नाला उत्तर देताना माझ्यासमोर भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या माळा घाला, मी कर बसवणार नाही, असे सांगितले होते.

Eknath Shinde, Sharad Pawar
Satara Political News : खासदार उदयनराजेंच्या प्रयत्नांना यश; साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार

कधी नाही तो कांद्याला भाव मिळत आहे. शेतक-याला दोन पैसे मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कर लादणार नाही, हे सभागृहात स्पष्ट केले होते. एका बाजूला महागाई आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्‍यांविरुध्द धोरणं राबवली जात आहेत. त्याविरोधात आम्ही लढणार आहोत. कांदा, ऊस वा टोमॅटो कुठल्याही शेतीमालावर बंधन नको, असे त्यांनी स्पष्ट केले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com