Sharad Pawar Solapur Tour : शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द; हे आहे कारण

Solapur Political News : रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक उशिरापर्यंत चालणार आहे. तसेच, सोलापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्यामुळे शरद पवार यांना सोलापूर पोचण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे शरद पवार यांनी सोलापूरचा रद्द केला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 April : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाला असून ते (स्व.) चंद्राम गुरुजींच्या पुतळ्याचे ऑनलाईन पद्धतीने अनावरण करणार आहेत, त्यामुळे पवारांच्या दौऱ्याकडे डोळे लावून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. अनेकांना पवारांना भेटण्याची इच्छाही अपूर्ण राहणार आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज दुपारी दोनपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी ते सध्या यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील इनोव्हेशन सेंटरला भेट देणार आहेत. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) हे दोन वाजता रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीला जाणार आहेत. ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालणार आहे, त्यामुळेच शरद पवार यांना आपला सोलापूर दौरा रद्द करावा लागला आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक उशिरापर्यंत चालणार आहे. तसेच, सोलापूरमध्ये नाईट लॅंडिंगची सोय नसल्यामुळे शरद पवार यांना सोलापूर (Solapur) पोचण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे शरद पवार यांनी सोलापूरचा रद्द केला आहे. पवार हे (स्व.) चंद्राम गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत.

Sharad Pawar
Bagal Group Politic's : निवडणुकीतून माघार घेतलेल्या बागल गटाच्या हाती ‘आदिनाथ’च्या सत्तेची चावी!

दरम्यान, शरद पवार हे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते, त्यामुळे पक्षसंघटनेतील अनेक नेत्यांनी पवारांच्या दौऱ्याकडे डोळे लावले होते. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची वादळ घोंघावत असताना सोलापूर जिल्ह्याने मात्र पवारांवरील प्रेम कायम राखले होते. कारण एकट्या सोलापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार आमदार निवडून आले आहेत.

संपूर्ण राज्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार निवडून आले आहेत. मात्र, एकट्या सोलापूरने पवारांचे चार आमदार निवडून दिले आहेत, त्यामुळे पवार सोलापूरमध्ये काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

Sharad Pawar
Sharad Pawar Solapur Tour : पवारांचा दौरा ठरणार सोलापूर राष्ट्रवादीला ‘टॉनिक’; मुक्कामातील घडामोडी ठरणार निर्णायक!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा दौरा महत्वपूर्ण मानला जात होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणकीत असणारी पक्षाची शिस्त काहींसी बिघडली आहे. पक्षसंघटनेला शिस्त लावण्यासोबतच सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा वैभव मिळवावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com