Koregaon News : जलसंपदा मंत्रीपद मिळूनही आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी जिहे- कटापूर उपसा जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत. कोरेगाव Koregaon आणि खटाव Khatav तालुका पाण्यासाठी कायम उपेक्षित ठेवला. या उलट सांगली जिल्ह्याला मोठ्या मनाने पाणी दिले. एकट्या वांगी -भिलवडी- पलुस भागाला एक टीएमसी पाणी देण्याचे पाप त्यांनी केले, असा आरोप आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक घेत कोरेगाव मतदारसंघातील पाणीप्रश्न संपुष्टात आणण्याचा निर्णय घेऊन या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिली आहे. शेल्टी गावापासून सर्वेक्षणास आज प्रत्यक्ष प्रारंभ झाला. त्याप्रसंगी शेल्टी, खिरखंडी, सिद्धार्थनगर, वाघजाईवाडी, जायगाव व एकंबे येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार महेश शिंदे बोलत होते.
आमदार महेश शिंदे म्हणाले, "कोरेगावच्या लोकप्रतिनिधींना जलसंपदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र त्यांनी दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी जिहे कठापूर योजना कायमस्वरूपी बंद होण्यासाठी तिचे वर्गीकरण केले. आपल्या हक्काचे पाणी सांगलीला दिले. स्थानिक जनतेला मात्र पाणी देतो, म्हणून बाता मारल्या.
दहा वर्षे नारळ फोडण्याशिवाय दुसरे काही केले नाही. पिढ्यानं पिढ्या बरबाद करण्याचे दुर्दैवी काम त्यांनी केले. कोयना प्रकल्पग्रस्त व एकंबे पंचक्रोशीला आता जिहे - कठापूर उपसा जलसिंचन योजनेतून पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली जाणार असून, त्याच्या सर्वेक्षणास आज प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे.
प्रारंभी आमदार महेश शिंदे यांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना विभागाच्या अभियंत्यांच्या पथकासमवेत शेल्टीच्या डोंगर पायथ्याशी जाऊन सर्वेक्षणाच्या कामाचा श्रीगणेशा केला. यावेळी प्रत्यक्ष पाहणी करून अभियंत्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.