Satara Highway News : महामार्गाच्या दुरवस्थेवरून शशिकांत शिंदे संतापले; म्हणाले, महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे काय...

National Highway गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तरीदेखील दर वर्षी टोलमध्ये भरमसाट वाढ केली जात आहे.
Shashikant Shinde, Jitendra Dudi
Shashikant Shinde, Jitendra Dudisarkarnama
Published on
Updated on

Satara Highway News : गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यावरून दिशा समितीच्या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे अधिकाऱ्यांवर भडकले. आमदार शिंदे म्हणाले, महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का. यापुढे जर सोयीसुविधा मिळणार नसतील, तर टोल नाके बंद पाडले जातील, असा इशारा त्यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिशा समितीची बैठक खासदार श्रीनिवास पाटील Srinivas Patil यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सातारा-लोणंद रस्त्याबाबतही श्रीनिवास पाटील व किरण साबळे-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. या रस्त्याच्या साइडपट्ट्या भरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार शिंदे म्हणाले, ‘‘महामार्गाचा ठेकेदार कोणाचा जावई आहे की काय? जिल्ह्यातील जनतेने फक्त टोलचे पैसेच भरत बसायचे का? यापुढे जर सोयीसुविधा मिळणार नसतील, तर टोल नाके बंद पाडले जातील.’’

जितेंद्र डुडी यांनीही महामार्गाबाबत असलेल्या तक्रारींवरून नाराजी व्यक्त केली. बैठकीत चर्चा होतात. मात्र, त्यावर महामार्ग प्राधिकरण पुढे काही करत नाही. ही बाब गंभीर असून, यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही. महामार्गावरील वाढते अपघात कमी करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करावी. दिशा समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांच्या उपस्थितीत महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी, अशा सूचना जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

Edited By Umesh Bambare

Shashikant Shinde, Jitendra Dudi
Satara Shivsena News : उद्धव ठाकरे ऑनलाइन मुख्यमंत्री; ते कधी शेतीच्या बांधावर गेलेत...शंभूराज देसाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com