Jawali Political News : शिवेंद्रराजेंच्या मतदारसंघात शशिकांत शिंदेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Shashikant Shinde आमदार शिवेंद्रराजेंच्या जावली मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंची स्वाभिमान सभा झाली.
NCP MLC Shashikant Shinde
NCP MLC Shashikant Shindesarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara-Jawali Political News : जावळी तालुका पुन्हा राष्ट्रवादीमय करण्यासाठी केळघर येथे स्वाभिमान सभेचे आयोजन केले होते. या सभेसाठी आलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांचे जावळीकरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत केले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जावळीत आमदार शिंदेंचे स्वागत झाले. जेसीबीतून पुष्पवृष्टी व क्रेनच्या साह्याने भला मोठा हार घालण्यात आला.

राष्ट्रवादीच्या NCP फुटीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून आपली ताकत आजमावली जाणार आहे. निवडणुकीत काय व्हायचा तो निर्णय होईल. पण आता खासदार शरद पवार Sharad Pawar यांच्या गटाकडून भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघात ताकत आजमावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

यातूनच आज सातारा-जावळी मतदारसंघात केळघर येथे आमदार शशिकांत शिंदे यांची स्वाभिमान सभा होत आहे. या सभेच्या निमित्ताने जावळीत विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

सभेसाठी आलेल्या आमदार शशिकांत शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी दोन जेसीबींच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच भला मोठा हार क्रेनच्या साह्याने आमदार शिंदे यांना घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मतदारसंघात प्रथमच राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे इतक्या जल्लोषात स्वागत झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार शिंदे पुन्हा सातारा, जावळीतून लढण्याचे संकेत मिळत आहेत.

Edited By Umesh Bambare

NCP MLC Shashikant Shinde
Satara Political News : आमदार अपात्रता प्रकरणात जाणूनबुजून चालढकल : शशिकांत शिंदेंचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.