Mumbai, 18 June : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातील घडामोडी काही केल्या थांबायला तयार नाहीत. मतमोजणी कक्षात मोबाईलवर बोलताना आढळलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देणारे अपक्ष उमेदवार भरत शाह यांना धमकी देण्यात आली आहे, त्यामुळे वायव्य मुंबई मतदारसंघ आणि रवींद्र वायकर यांचा विजय पुन्हा चर्चेत आला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर (Mangesh Pandilkar) हे मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी कक्षात मोबाईल बोलत असल्याचे आढळून आले होते. त्यांच्या विराधोत भरत शाह (Bharath Shah) यांनी मुंबई पोलिसांत प्रथम तक्रार दिली होती. त्या भरत शाह यांना खोट्या गुन्ह्याची फिर्यादीमध्ये अडकाण्याची धमकी देण्यात आली आहे.
भरत शाह म्हणाले, रवींद्र वायकर यांचा मेहुणा आणि मेहुणी हे मतदान कक्षातून सतत फोन करत होते. मतदान कक्षात जे काही सुरू आहे, त्याबाबत ते रवींद्र वायकर यांना सर्वकाही सांगत होते. त्यामुळे मतमोजणी कक्षातील सर्व घडामोडी ह्या रवींद्र वायकर यांना समजत होत्या.
मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळून राहण्याची धमकी देण्यात आली आहे. आरोप करून तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. काहीही करून तुमच्या विरोधात गुन्हा नोंदविला जाईल, अशी धमकी मला देण्यात आली आहे. याशिवाय मला मारण्याचीही तयारी केली जात आहे, असा गंभीर आरोप भरत शहा यांनी केला आहे.
रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात मीच पहिल्यांदा मुंबईत पोलिसांत तक्रार दिली होती. माझी फिर्याद न घेता पोलिसांनी तहसीलदारांची फिर्याद नोंदविली आहे. त्यामुळे हे प्रकरण कोणत्याही परिस्थिती दाबून टाकण्याचे नियोजन रवींद्र वायकर आणि त्यांच्या पक्षाकडून केले जात आहे. या प्रकारणात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केला जात आहे, असा मेसेज आम्हाला मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.