Gokul Dudh Sangh : गोकुळच्या वार्षिकसभेपूर्वी सत्ताधारी विरोधकांमध्ये 'व्हॉट्स अ‍ॅप वॉर'!

Kolhapur Zilla Sahakari Dudh Sangh : हा मलई चोर बोका नेमका आहे कोण? याबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
Gokul Dudh Mahasangh
Gokul Dudh MahasanghSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Dudh Sangh : कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ मध्ये वार्षिक सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्हॉट्स अ‍ॅप वॉर सुरू झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह यापूर्वीच उपस्थित केले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून व्हॉट्स अ‍ॅप पोस्ट व्हायरल होत आहे.

अशातच गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण वार्षिक सभा 30 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून निनावी पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये गोकुळचे कारनामे सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी आणि सभासदांपुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे यंदाची सभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. या पोस्टमध्ये गोकुळमध्ये काळे कारनामे करणाऱ्या मलई चोर बोक्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हा मलई चोर बोका नेमका आहे कोण? याबाबत दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

गोकुळची सर्वसाधारण वार्षिक सभा 30 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. विरोधकांचा आवाज दाबला जाण्याचा आरोप होत आहे. वाहतूक खर्च, खराब दूध, गोकुळच्या ठेवीमध्ये होणारी सातत्याची घसरण, पशुखाद्य कच्चा माल खरेदीसह अन्य कारणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे यंदाची ही वार्षिक सभा गाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून निनावी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे.

Gokul Dudh Mahasangh
Mahavikas Aghadi : कडेगावमध्ये गाजणार 'मविआ'च्या प्रचाराचा ट्रेलर, वाचा कोण कोण राहणार उपस्थित?

या पोस्टच्या माध्यमातून मलाई चोर बोका या टॅगलाईन खाली सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले आहेत. गेल्या चार वर्षात रिजेक्टेड किती लिटर दूध संस्थांना परत केले? अ वर्ग सभासद संस्था कागदावरच वाढल्या, मग दूध प्रमाणात वाढ का झाली नाही? ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालणाऱ्या महालक्ष्मी पशुखाद्य आहाराच्या किमती इतर पशुखाद्याप्रमाणे का? गेल्या चार वर्षात गोकुळच्या ठेवीमध्ये कोट्यावधींची घट का? असे विविध गैरकारभारांना विरोधकांनी हात घातला आहे.

Gokul Dudh Mahasangh
Droupadi Murmu : 'आता बास झालं! मी खूप निराश आणि भयभीत झाले!' राष्ट्रपती का झाल्या एवढ्या भावनिक?

त्याचबरोबर दुय्यम प्रतीचे आणि वासाचे दूध संस्थांना परत कधी देणार? एकूण दूध संकलनापैकी जिल्ह्याबाहेरील दूध किती? त्या दुधाची सरासरी गुणप्रत काय? ग्राहकावर बोजा न टाकता उत्पादकांना किती रुपयांची दरवाढ दिली? असे अनेक प्रश्न विरोधकांनी या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारले आहेत. तसेच सभासदत्वासाठी असलेली 50 लिटरची अट वगळणारा सूर्याजी पिसाळ कोण असाही सवाल केला आहे.

दरम्यान विरोधकांकडून या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत प्रत्युत्तर दिले आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या महालक्ष्मी पशु खाद्याचा दर इतर पशु खाद्या इतका का? याचं उत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी गुणवत्तेत नाही तडजोड म्हणून मार्केटमध्ये सडेतोड असं प्रत्युत्तर दिलं आहे.

तर गोकुळच्या ठेवीत दरवर्षी होणारी घसरण का? याला उत्तर देताना सत्ताधाऱ्यांनी शासन निर्धारित दरापेक्षा गाय दुधास लिटरला सरासरी पाच ते सात रुपये जाद दर, स्वभांडवालातून मुंबई शाखेचे विस्तारीकरण, सोलार पार्क असे प्रकल्प राबवल्याने संघाची वर्षाला सुमारे १५ कोटींची बचत होणार आहे. गोकुळच्या दुध संकलनात साडेसहा कोटी लिटरची वाढ झाली आहे. असे प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी दिले आहे. सत्ताधारी आण विरोधकांमध्ये सुरू झालेल्या व्हॉट्स अ‍ॅप वॉर मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची करमणुक होत आहे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com