
Dapoli News : कोकणात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात कोकणात उद्धव ठाकरे यांच्या साम्राज्याला सुरूंग लाण्याचे काम सुरू आहे. दापोली नगर पंचायतावरील ठाकरे गटाचे सत्ता देखील आता उलथवण्याचे काम शिंदेची शिवसेना करत आहे. येथील याआधीच ठाकरे गटाचे 14 नगरसेवक फोडण्यात आले आहेत. या 14 नगरसेवकांनी आपला वेगळा गट तयार करून शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची तयारी शिंदेची शिवसेना करत असल्याने येथील सत्ता आता धोक्यात आली आहे.
दापोली नगरपंचायतीत ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता आता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या 14 नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे. हे मंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून तीन वर्षांपूर्वी ठाकरे आणि अनिल परब यांनी टाकलेला डाव आता उधळण्यात येणार आहे. असे झाल्यास दापोली नगरपंचायत मंत्री योगेश कदम यांच्या ताब्यात जाणार आहे.
नगराध्यक्षा ममता मोरे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरचा दुसरा अंक येथे सुरू झाला असून कोकणात ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देण्याचे काम सुरू झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या पुढाकाराने दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाने सत्ता स्थापन केली होती. रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना शह दापोली नगरपंचायतीत अस्तित्व निर्माण केलं होतं. पण आता मंत्री योगेश कदम यांनी आघाडीची सत्ता उलथून टाकण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
मंत्री होताच योगेश कदम यांनी ठाकरे गटाला हादरा दिला असून नगराध्यक्षा मोरे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. जिल्हा प्रशासनालादेखील मंगळवारी (ता. 4) याबाबत पत्र देण्यात आले आहे. तर आता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष बदल निश्चित मानले जातेय.
ठाकरे गट आणि शरद पवार गटातील 14 नगरसेवकांनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन केला होता. तर चार दिवसांपूर्वीच शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. हा पक्ष प्रवेश शिवसेनेच्या युवा नगरसेविका शिवानी खानविलकर यांच्या नेतृत्वात पार पडला होता. यानंतर आता अविश्वास ठराव संमत झाल्यास शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका कृपा घाग व शिवानी खानविलकर यांची नावे रेसमध्ये आहेत.
दरम्यान आता या ठरावाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा ममता मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, शिवसेनेची नगराध्यक्षा म्हणून कार्यभार पाहात आले आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहिले. मोरे कुटुंबीय सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहेत. आता जे राजकारण सुरू आहे, ते कल्पनेपलीकडील आहे. माझ्यावर अविश्वास ठराव आणल्याचे प्रसारमाध्यमांकडून समजले. वरिष्ठांशी चर्चा करून यापुढील निर्णय घेऊ, असेही नगराध्यक्षा ममता मोरे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.