नगर शहरातील शिवसैनिकांत दुफळी : बंडखोर आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात काही नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.
Shivsena Ahmednagar
Shivsena AhmednagarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - राज्यातील शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. त्याचेच प्रतिबंब आता अहमदनगर शहरातील शिवसैनिकांत दिसू लागले आहे. ग्रामीण भागात मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्या समवेत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या अहमदनगर दक्षिण विभागाचा आज (मंगळवारी) उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात काही नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बंडखोर आमदार व मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. Shivsena News Update

शिर्डीत काल ( सोमवारी ) शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी शक्तिप्रदर्शन करत बंडखोर आमदारांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला. कोपरगावसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांचे समर्थन करण्यात आले. मात्र अहमदनगर शहरात मात्र शिवसेना नगरसेवकांत दोन गट दिसून येऊ लागले आहेत.

Shivsena Ahmednagar
आठ महिन्यांपूर्वीच ठरला होता बंडखोरीचा प्लॅन; शिवसेना नेत्याचा खळबळजनक खुलासा

शिर्डीत बंडखोर आमदारांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळ्यांचे दहन होऊ दिले नाही. टायर पेटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसैनिकांकडील टायर हिसकावण्यावरून पोलीस व शिवसैनिक यांच्यात झुंबड उडाली. या वेळी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ व बंडखोरांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात अहमदनगर उत्तरचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र झावरे, कमलाकर कोते, सुहास वहाडणे, विजय काळे, तालुकाप्रमुख संजय आप्पा शिंदे, विजय जगताप आदी सहभागी झाले होते.

शिवसेनेच्या अहमदनगर दक्षिण विभागाचा मेळावा जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी घेतला. यात महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक योगिराज गाडे, पुष्पा बोरूडे, बाळासाहेब दुतारे, माजी नगरसेवक दिलीप सातपुते आदी उपस्थित होते. मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांचे नगर शहरातील समर्थक समजले जाणारे नगरसेवक अनिल शिंदे व त्यांच्या समवेत असलेल्या नगरसेवकांचा गट अनुपस्थित होता. उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला तसेच बंडखोर मंत्री व आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उपस्थित शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत आपण सर्व राहणार असे सांगितले.

Shivsena Ahmednagar
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावे मात्र फडणवीसांची साथ देऊ नये

पुन्हा दुफळी दिसली

अहमदनगर महापालिकेत मागील काही वर्षांपासून शिवसेनेतील दुफळी प्रकर्षाने दिसत आहे. मागील एका वर्षापासून शिवसेनेतील ही दुफळी जास्तच दिसत आहे. मागील वर्षी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत महापालिकेत सत्ता मिळविली. यात अनिल शिंदे यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा गट दुखावला गेला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com