Vijaykumar Deshmukh : शिंदेंच्या शिलेदाराने चंद्रकांतदादांसमोरच मांडली भाजप आमदाराच्या मनातील खदखद; मंत्री पाटलांचेही सूचक वक्तव...

Amol Shinde Statement : सोलापूर भाजपच्या निर्णयप्रक्रियेपासून विजयकुमार देशमुख दूर असल्याच्या पार्श्वभूमीवर अमोल शिंदे यांनी त्यांचा ‘भाजपचे सोलापुरातील आजोबा’ असा उल्लेख केला. चंद्रकांतदादांनी बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य केले.
Amol Shinde-Vijaykumar Deshmukh-Chandrakant Patil
Amol Shinde-Vijaykumar Deshmukh-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 September (प्रभूलिंग वारशेट्टी) : गेली दोन वर्षांपासून सोलापूर भारतीय जनता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून माजी मंत्री, ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख हे दूर आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत ते भाजपच्या निर्णयप्रक्रियेत दिसून आले नाहीत. पालकमंत्री आणि इतर आमदारांसोबत त्यांचा दुरावा स्पष्ट दिसून येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर आजोबा गणपती विशेष टपाल लिफाफा अनावरण सोहळ्यात शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी विजयकुमार देशमुखांचा उल्लेख ‘भाजपचे सोलापुरातील आजोबा’ असा केला. दादा, आजकाल आजोबांना काल परवा आलेले नातू शिकवायला लागले आहेत, पण आजोबा आजोबा असतात, असा टोला पक्षांतर्गत विरोधकांना लगावला. त्यावर चंद्रकांतदादांनी राजकारणातील चढ-उतार आणि बदलत्या समीकरणांवर भाष्य करत विजयकुमार देशमुखांना सबुरीचा सल्ला दिला.

सोलापुरातील आजोबा गणपतीच्या विशेष टपाल लिफाफ्याचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना नगरसेवक शिंदे यांनी आमदार देशमुख यांच्या भाजपमधील सद्यस्थितीवर भाष्य केले.

नगरसेवक अमोल शिंदे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांचा उल्लेख ‘भाजपचे सोलापुरातील आजोबा’ असा करत त्यांच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच त्यांनी, ‘दादा, आजकाल आजोबांना काल-परवा आलेले नातू शिकवायला लागलेत; कितीही नातू आले तरी आजोबा आजोबाच असतात,’ असा टोला देशमुखांच्या पक्षांतर्गत विरोधकांना लगावला, त्यामुळे व्यासपीठावर एकच हशा पिकला.

Amol Shinde-Vijaykumar Deshmukh-Chandrakant Patil
Sangola Politic's : सत्तेत असूनही शहाजीबापूंच्या शिलेदारांना अधिकारी जुमानेनात; संतप्त उपसभापतीने पंचायत समितीचे काम दोन तास बंद पाडले

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राजकारणातील चढ-उतार आणि बदलत्या समीकरणांचा संदर्भ देत विजयकुमार देशमुखांना सबुरीचा सल्ला दिला. ‘कालचक्र’ आणि निसर्गाच्या नियमाचे उदाहरण देत राजकारणात रात्र-पहाट, ऊन-सावलीप्रमाणे चढ-उतार अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

विजयमालक यांच्याकडे सध्या मोठी जबाबदारी नसली तरी आजोबा गणपतीचा आशीर्वाद व स्वामीजींचे अधिष्ठान त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत, ‘येत्या काळात काहीही घडू शकते,’ असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत ‘देर है, अंधेर नहीं,’ असे म्हणत विजयमालक पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

Amol Shinde-Vijaykumar Deshmukh-Chandrakant Patil
Chandrakant Patil: ‘टक्केवारी देता देता ठेकेदार मरून जातो’; चंद्रकांत पाटलांकडून बोलता बोलता लोकप्रतिनिधींच्या कमिशनखोरीची जाहीरपणे कबुली

चंद्रकांतदादांच्या विधानाने भूवया उंचावल्या

‘भाजपचे आजोबा’, ‘नातू शिकवायला लागले’, ‘येत्या काळात काहीही घडू शकते’ आणि ‘देर है, अंधेर नहीं’... एकाच मंचावर उमटलेल्या या विधानामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. आजोबा गणपतीच्या सोहळ्यातील या अनपेक्षित राजकीय संकेतांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com