शिवसेना खासदार लोखंडेंनी राज्यातील परिस्थितीवर दिली सावध प्रतिक्रिया : म्हणाले...

शिवसेनेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर सावधपणे मत व्यक्त केले.
Shivsena MP Sadashiv Lokhande
Shivsena MP Sadashiv Lokhande Sarkarnama
Published on
Updated on

शिर्डी ( जि. अहमदनगर ) - शिवसेनेत फुट पडली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे 15 वर्षे आमदार राहिले व मागील 8 वर्षांपासून शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे खासदार असलेल्या सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर सावधपणे मत व्यक्त केले. ( Shiv Sena MP Lokhande gave a cautious response to the situation in the state: said ... )

शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदारांनाही फुटीचे वेध लागले असताना, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मात्र ‘मातोश्री’वरील सलग तीन बैठकांना हजेरी लावली. आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, असे संकेत त्याद्वारे दिले. आपण छोटी माणसे... सध्याच्या घडामोडींवर आपण काय प्रतिक्रिया देणार, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Shivsena MP Sadashiv Lokhande
असा झाला सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास

राजकीय कुंडलीतील प्रबळ राजयोगाचे धनी असलेले लोखंडे हे हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे पसंत करतात. सध्याच्या पेचप्रसंगातही त्यांची ही भूमिका उठून दिसणारी आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचे लक्षात येताच ‘मातोश्री’वरून सर्व आमदार आणि खासदारांना तातडीने मुंबईला येण्याचे निरोप धाडण्यात आले. त्यावेळी लोखंडे दिल्लीत होते. ते लगेचच ‘मातोश्री’वर दाखल झाले. या पेचप्रसंगानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पहिल्या बैठकीस त्यांनी हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी पुन्हा दुसऱ्या बैठकीसदेखील ते उपस्थित होते. काल ते अहमदनगर जिल्ह्यात होते. आज सायंकाळी सात वाजता पुन्हा ‘मातोश्री’वर येण्याचा निरोप त्यांना सकाळी मिळाला. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.

2014 मध्ये ते श्रीरामपूरमधून शिवसेनेकडून आमदारकीची निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांचे त्यावेळचे मित्र कोपरगावचे माजी आमदार अशोक काळे यांनी त्यांना शिवसेनेकडून खासदारकी लढविण्याचा आग्रह केला. मोदी लाटेत ते कुठलीही तयारी नसताना, केवळ 17 दिवसांच्या प्रचारात खासदार झाले.

Shivsena MP Sadashiv Lokhande
खासगी डॉक्‍टरांनी माणुसकी दाखवावी : खासदार सदाशिव लोखंडे

दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला. त्यावेळीही त्यांना मोदी लाटेचा मोठा फायदा झाला. सहजपणे सलग दोन वेळा खासदार झालेले लोखंडे यांच्या कुंडलीतील राजयोगाचा प्रभाव यावेळी सर्वांनीच अनुभवला. खासदारकीच्या काळात निळवंडे कालव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यापासून ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या सर्वांचे सहकार्य मिळविले. त्यांच्या जलदिंडीसोबत शिवसेनेचे सहा कॅबिनेट मंत्री हे पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशावरून तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले.

हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण देण्यासाठी शिर्डीकरांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केली. थोडक्यात सांगायचे, तर शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अतिशय चांगले संबंध हे त्यांचे बलस्थान आहे. अनावश्यक टीकाटिप्पणी करून वादविवाद ओढवून घेणे त्यांना पसंत नाही. प्रस्थापितांना न दुखावता वाटचाल सुरू ठेवणे हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे या पेचप्रसंगातही ते सध्या शिवसेनेसोबतच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com