Shiv Sena Politics : शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा उरलासुरला पक्षही फोडणार; कोल्हापुरात लवकरच मोठा धमाका...

Eknath Shinde’s Next Move in Shiv Sena Politics : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना यांच्या पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश मुंबई येथे होणार आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक मातब्बर पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. आता शिंदे पुन्हा एकदा धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ते तीन महिन्यांपूर्वी मुंबईत महापौर, माजी महापौर, उपमहापौर, नगरसेवक अशा एकूण 37 जणांचा पक्षप्रवेश झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरेंना धक्का देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना यांच्या पक्षातील काही प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश मुंबई येथे होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चा अधिक रंगल्या होत्या. मात्र पहिल्या टप्प्यातील पक्षप्रवेश झाल्यानंतर या चर्चांना ब्रेक मिळाला होता.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवईंच्या 'त्या' विधानावरून वाद; टीका होताच स्पष्ट केली भूमिका, मेहता, सिब्बलही मदतीला...

ठाकरेंच्या पक्षात उरलेल्या काही माजी नगरसेवकांना शिंदेंच्या शिलेदारांनी फोडल्याचे सांगितले जात आहे. जवळपास 15 ते 20 जणांचा गट पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यातील पक्षप्रवेश झाल्यानंतर अनेकांनी प्रारूप प्रभाग रचनेनंतर निर्णय घेण्याची तयारी दर्शवली होती. मनासारखा प्रभाग रचना झाल्यानंतर अनेकांनी या पक्षप्रवेशाला सहमती देण्याचा निर्णय घेतला होता.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Rohit Pawar Vs Ram Shinde : राम शिंदे ज्या गुंडाला विधानभवनात घेऊन फिरतात..! घायवळ टोळीच्या गोळीबारानंतर रोहित पवारांनीही साधली संधी...

पंधरा दिवसांपूर्वी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पक्षप्रवेशाच्या या घडामोडीला आता वेग आला आहे. अनेकांसाठी सोयीस्कर प्रभाग झाल्यानंतर सत्तेतील पक्षासोबत राहण्यासाठी आणि त्यातून निवडून येण्यासाठी पक्षप्रवेशाचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा कोल्हापुरात मोठा झटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप कोणते माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षप्रवेश करणार याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com