सातारा शहर शिवसेना फुटणार; दहा पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होणार

ठाणे Thane तसेच मराठवाडा Marathwada येथेही शिवसेनेच्या Shivsena पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा Resigned सत्रामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हे राजीनाम्याचे लोन सातारा Satara शहरात पसरले आहे.
Udhav Thackeray, Eknath Shinde
Udhav Thackeray, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

सातारा : शिवसेनेच्या सातारा शहर कार्यकारिणीचे तब्बल दहा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. पदाधिकाऱ्यांच्या या पवित्र्यामुळे शहर कार्यकारणीत खळबळ उडाली असून या कार्यकारणीचे 'डॅमेज कंट्रोल' कोण करणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर सत्तापालट होऊन एकनाथ शिंदे गट आणि भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक निलेश मोरे यांना शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र, या गटाने आपलीच शिवसेना ही मूळ असल्याचा दावा केल्याने शिंदे समर्थक गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गट अशा दोन गटांमध्ये कार्यकर्ते विभागले गेले आहेत.

Udhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena : शिवसेना संपू नये, ही प्रत्येक मराठी माणसाची भावना!

त्यातच शिवसेनेच्या सातारा शहर कार्यकारणीत सुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे. सातारा शहर संघटक अमोल इंगोले, उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ, उपशहरप्रमुख सयाजी शिंदे, विभाग प्रमुख अमोल खुडे, उपविभाग प्रमुख म्हणून मनोज भोसले, शाखा क्रमांक एक पंताचा गोट येथील शाखाप्रमुख अमोल पवार, उपशाखाप्रमुख प्रथमेश बाबर, बुथ प्रमुख आसिफ फकीर, प्रभाग क्रमांक पाच मधील विभाग प्रमुख सुमित नाईक, सदरबझार येथील उपविभागप्रमुख रजत नाईक या दहा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शिंदे गटाला समर्थन देण्याची तयारी केली आहे.

Udhav Thackeray, Eknath Shinde
सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धवजींच्या पाठीशी... शेखर गोरे

ठाणे तसेच मराठवाडा येथेही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या राजीनाम्याचे लोन सातारा शहरात पसरले असून तब्बल दहा शिवसैनिक शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे निलेश मोरे म्हणाले, साताऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही.

Udhav Thackeray, Eknath Shinde
चाळीस रेडे काय करू शकतात याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले....शंभूराज देसाई

जिल्हा कार्यकारणीचे आणि शहर कार्यकारणीत कधीही वितंडवाद नव्हता. मात्र तरीही शहर कार्यकारणीच्या सदस्यांना बळ दिले गेले नाही. आम्ही कोणीही शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट असा कोणताही गट मानत नाही. आजही शिवसेना अभंग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेची वाटचाल आणि सातारा शहर तसेच जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचे काम आहोरात्र सुरूच राहिल, असेही निलेश मोरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com