Shivsena UBT Dispute : ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद पेटला; ऐन निवडणुकीत जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा

Solapur Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताना पक्षातील वादावर बोट ठेवले आहे.
Santosh Patil
Santosh PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 December : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वाद काही केल्या मिटायला तयार नाही. ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आज दुपारी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या विरोधात पक्षाच्या निष्ठावंतांनी मेळावा घेतला तर सायंकाळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद उफाळला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. राजीनामा देताना त्यांनी पक्षातील वादावर बोट ठेवले आहे, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर अमर पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर संतोष पाटील (Santosh Patil) यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, अवघ्या वर्षभरातच संतोष पाटील यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Santosh Patil
Ravindra Dhangekar: मोठी बातमी! रविंद्र धंगेकर अजित पवारांच्या भेटीला; पुण्यातील बंगल्यावर मोठ्या घडामोडींना वेग

संतोष पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मी संतोष सिदगोंडा पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. पक्षांतर्गत वादामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, तरी माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा. पाटील यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेपुढील आव्हाने वाढण्याची शक्यता आहे.

Santosh Patil
Nashik BJP : भाजपचा घराणेशाहीचा नियम नाशिकसाठी नाही का? दोन आमदारांच्या मुलांनी अर्ज दाखल करायचे दाखवले धाडस

दरम्यान, दुसरे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत आक्रमक झाले आहेत. त्यांनी दासरी यांच्या विरोधात मेळावा घेत त्यांना जिल्हाप्रमुखपदावरून हटविल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही, असा इशारा मेळाव्यातून देण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com