Seema Hire, Devyani Farande
Seema Hire, Devyani FarandeSarkarnama

Nashik BJP : भाजपचा घराणेशाहीचा नियम नाशिकसाठी नाही का? दोन आमदारांच्या मुलांनी अर्ज दाखल करायचे दाखवले धाडस

Nashik municipal election : भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने व आमदार सीमा हिरे यांच्या मुलीने नाशिक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आज अर्ज दाखल केले.
Published on

Nashik Politics : पुण्यातील आमदार व खासदारांकडून आपल्या मुलांना, घरातील व्यक्तींना व नातेवाईकांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा घाट घातला जात होता. ही तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचली आणि त्यांनी घराणेशाहीला रोखण्यासाठी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला.

भाजपमधील लोकप्रतिनिधींच्या मुलांना, नातेवाईकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात घेतला. त्यामुळे पुण्यातील आमदारांना आणि खासदारांना चांगलाच दणका बसला. महापालिका निवडणुकीत आमदार आणि खासदारांनी त्यांच्या मुला मुलींसाठी तसेच नातेवाईकांसाठी शिफारस केलेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही असा निरोप वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आलेला आहे. पंरतु भाजपचा हा नियम नाशिक महापालिकेसाठी नाही का असा प्रश्न आता उपस्थितीत होऊ लागला आहे.

कारण, सोमवार (दि. २९) भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये विशेष म्हणजे भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच भाजपच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी बेंडाळे-हिरे यांनी व दीर माजी नगरसेवक योगेश (मुन्ना) हिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

Seema Hire, Devyani Farande
Nashik NMC Election : नाराजीनाट्य संपलं.. आमदार देवयानी फरांदेंचे पुत्र, सीमा हिरेंची मुलगी, दिनकर पाटलांकडून अर्ज दाखल

त्यामुळे भाजपने जो कायदा पुण्यात लावला तो नाशिकमध्ये लागू नाही का असा सवाल या निमित्ताने उपस्थिती केला जाऊ लागला आहे. आमदार- खासदारांच्या घरात उमेदवारी गेल्यास त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यांच्यात नाराजी उफाळून येऊ शकते. म्हणून पुण्यात आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी द्यायची नाही असा निर्णय पुण्यात भाजपने घेतला. परंतु नाशिकमध्ये पूर्णपणे विरोधाभास दिसला. पक्षाकडून अद्याप एबी फॉर्म वाटप केले नसताना दोन आमदारांच्या मुलांनी अर्ज दाखल करायचे धाडस दाखवले.

Seema Hire, Devyani Farande
Manikrao Kokate Case : माणिकरावांना मिळाला दिलासा पण त्यांच्या भावाचे काय? शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून न्यायालयात धाव

पुणे महानगरपालिकेसाठी भाजपने आमदार, खासदार यांच्या मुलांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचा जो निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचे वातावरण असून कार्यकर्त्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. एबी फॉर्म देताना अशाच प्रकारचा निर्णय नाशिकमध्ये घेतल्यास आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे दोघांनाही मोठा धक्का बसेल असे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com